Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धोंडीपुरा शाळेची धोकादायक जुनी इमारत पाडली

नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास !

बीड प्रतिनिधी - शहरातील बुंदलपुरा भागात असलेली धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या स्थितीत आली होती. याची नोंद घेत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ

सेल्फीच्या नादात दोन जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू
*”माधव” समाजाकडून बारा-बलुतेदार, अठरा अलुतेदारांच्या आरक्षणावर गदा… l Lok News24
वाघोबा खिंडीत एसटीच्या रातराणी बसचा भीषण अपघात I LOKNews24

बीड प्रतिनिधी – शहरातील बुंदलपुरा भागात असलेली धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या स्थितीत आली होती. याची नोंद घेत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना उद्देशून वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमी प्रकाशित केली होती. याची नोंद घेत जिल्हा प्रशासनाने धोकादायक स्थितीतील असलेली शाळेची भिंत पाडली आहे. यामुळे सदरील शाळेपासून होणारा संभाव्य धोका टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. यामुळे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हा प्रशासनासह प्रसिद्धी माध्यमाचे आभार व्यक्त केले आहे.
धोंडीपुरा केंद्रीय प्राथमिक शाळेची सदरील जुनी इमारत गेल्या अनेक वर्षांपासून पडीक अवस्थेत होती. वापरात नसल्याने शाळेचा आतील भाग पूर्णतः नष्ट झाला होता. फक्त बाहेरील भिंती तेवढ्या उरल्या होत्या परंतु त्यातही काही दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडले होते आणि दगडी बांधकामांवर असलेल्या विटाचे बांधकाम बाहेर बाजूने कलले होते. याची दखल घेऊन ही धोकादायक इमारत पाडण्यात आली. हे पाहता प्रशासन जागरूक आणि गतिमान असेल तर नागरिकांकडून आलेल्या सूचना व तक्रारी आणि लोकशाहीच्या चौथ्या  आधारस्तंभाने विषय मांडल्यावर कशाप्रकारे पटकन कामे केली जातात याचे उदाहरण या कार्यानिमित्ताने समाजासमोर आले आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हे कर्तव्यदक्ष व जनतेकडून आलेल्या सूचना व प्रसिद्धी माध्यमांनी मांडलेल्या विषयाकडे लक्ष देणारे असले तर आवश्यक असलेली कामे कशी पटकन होतात याचा अनुभव धोंडीपुरा शाळेच्या जीर्ण झालेल्या भिंतीं पाडल्याने दिसून आले आहे. आता या भिंतींपासून होणारा संभाव्य धोका टळला आहे. यामुळे जागरूक आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे बातमीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे लक्षवेधणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी आभार व्यक्त केले आहे.

COMMENTS