Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार मजबूत, पण केव्हाही कोसळू शकते : बच्चू कडू

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप शिंदे गटासोबत सत्तेत अजित पवार गट सहभागी झाल्यामुळे शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंड

बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा
दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय- बच्चू कडू 
रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केला

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप शिंदे गटासोबत सत्तेत अजित पवार गट सहभागी झाल्यामुळे शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ विस्तार न करता, अजित पवार गटाला प्रथम प्राधान्य देत, मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यामुळे शिंदे गटातील आमदार उघड नाराजी व्यक्त करत आहे. यासंदर्भात बोलतांना आमदार बच्चू कडू म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी देण्यात आली असावी. त्यामुळेच आमच्या शपथविधीचा विचार झाला नसावा, तसेच तीन इंजिनाचे सरकार मजबूत आहे. पण ते केव्हाही कोसळू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे शिंदे गट सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेवू शकतो, असे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेमधून बाहेर पडतांना शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, तसेच तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार आपल्या आमदारांना निधी देत नसल्याची ओरड या आमदारांनी केली होती, त्यातच पुन्हा आता अजित पवारांना अर्थखाते देण्यास या मंत्र्यांनी विरोध केल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी वाढतांना दिसून येत आहे. बच्चू कडू पुढे म्हणाले की, अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळू नये अशी आमच्या गटातील आमदारांची इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्रीपदी असताना त्यांनी पवारांनी निधीची पळवापळवी केली. त्यामुळे आम्ही इकडे आलो. आम्ही अजित पवार यांचा आमच्या मतदार संघातील हस्तक्षेप अजिबात सहन करणार नाही. हे तीन इंजिनाचे सरकार आहे. ते मजबूत आहे. पण केव्हाही कोसळू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा आहे? या प्रश्‍नावर बच्चू कडू म्हणाले, मला कोणतीही अपेक्षा नाही. परिस्थिती येईल तसे आम्ही मार्गक्रमण करत असतो. मी अपेक्षा ठेऊन कधी चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मंत्रीपदाबाबत गत दोन-तीन दिवसांत मला कोणताही फोन आला नाही. सत्ताधारी पक्षाचे 90 टक्के आमदार मुंबईत आहेत. हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक आहे. इतके आमदार सांभाळताना नाराजी तर होणारच आहे. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. सगळे आनंदी आहेत असे नाही. विरोधी पक्षातही सगळे आनंदी नाहीत आणि सत्ताधारी पक्षातही सगळे आनंदी नाहीत. त्यामुळे सगळे सुखी राहतील असा सुखी माणसाचा सदरा अद्याप तरी आलेला नाही, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

शिंदे गटातच लाथाळ्या – भाजप आणि शिंदे गटासोबतच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गटाला केवळ 14 आणि अजित पवार गटाला 14 आणि भाजप गटाला 15 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या 20 आमदार मंत्रीपदे देण्यात आल्यामुळे आता केवळ शिंदे गटाला 4 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गटामध्ये जोरदार लाथाळ्या बघायला मिळू शकतात.शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्हही शिंदेंच्या गटाला मिळाले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिंदेंच्या गोटातील आमदारांनी अनेकदा आपली मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे.

COMMENTS