Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्बुलन्स सेवा

राज्य सरकारचा निर्णय ः हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर सातत्याने होणार्‍या अपघातामुळे राज्य सरकारची डोकुदखी वाढतांना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वीच ट्रॅव्हल्सला

लिव्ह इन’ रिलेशनशिपचा धक्कादायक अंत | LOKNews24
मनपाच्या 32 कोटींचा गैरवापर होऊ देणार नाही
23 रोजी नांदेड येथे  सर्वधर्मीय सामुहिकविवाह मेळावा 

मुंबई/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर सातत्याने होणार्‍या अपघातामुळे राज्य सरकारची डोकुदखी वाढतांना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वीच ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातानंतर लागलेल्या आगीत 25 प्रवासी होरपळून मृत्यू झाला होता, त्यानंतर राज्य सरकारने या महामार्गावर एअर अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून, त्यासाठी हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून एअर अ‍ॅम्बुलन्सची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू केल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर कंपनीशी करार झाल्यानंतर समृद्धी महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना हेलिकॉप्टरने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. याशिवाय राज्यातील काही महत्त्वाच्या रुग्णालयांसोबतही राज्य सरकारकडून करार केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार असून अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समृद्धी महामार्गावर आखून दिलेल्या मार्गांनीच प्रवेश करता येतो. अनेक ठिकाणी मार्गावर जाण्यासाठी व खाली उतरण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. याशिवाय काही ठिकाणी महामार्गाला कुंपण करण्यात आल्याने अपघात झाल्यानंतर स्थानिकांना महामार्गावर येता येत नाही. अशात महामार्ग हा आजुबाजूच्या परिसरापासून उंचीवर असल्याने खाली असलेल्या रहिवाशांनाही अपघात झाला आहे की नाही? हे समजत नाही. त्यामुळे जखमींना तातडीने मदत मिळत नाही. आग किंवा धुरामुळे स्थानिकांना अपघाताची माहिती मिळाली तरी त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाणे, रुग्णवाहिकेला फोन करणे, त्यानंतर रुग्णवाहिका येणे यात बराचसा वेळ जातो. त्यामुळे बहुतेक अपघातग्रस्तांचा जागीच मृत्यू होतो. बुलडाण्यातील खासगी बस अपघात झाल्यानंतर स्थानिकांना या अपघाताबाबत उशीरा समजल्याचे समोर आले होते. तसेच, जे घटनास्थळी उपस्थित होते, त्यांनाही आगीमुळे मदत करता आली नाही. इतर बचावपथक येईपर्यंत प्रवाशांचा जळून कोळसा झाला होता. याशिवाय महामार्गावर कोणतेच ब्रेक पॉईंट नसल्याने वाहनचालकांची तंद्री लागत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने महामार्गावर एअर अ‍ॅम्बुलन्सची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धीवर ट्रक आणि ट्रॅव्हल्सची भीषण धडक – समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स आणि ट्रकची जोरदार धडक झाली असून या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समधील 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

COMMENTS