Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

कर्नाटक प्रतिनिधी - कर्नाटकामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. क

मालवाहू ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक चार जणांचा जागेवरच मृत्यू
भीषण अपघात! एसटी बस आणि इको कारची समोरासमोरच जोरदार धडक.
कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले

कर्नाटक प्रतिनिधी – कर्नाटकामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचा तपास कर्नाटका पोलिसांकडून सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ वर हा अपघात झाला आहे. भरधाव कारने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही कार बागेपल्लीवरून चिक्कबल्लापूरला जात होती. ही घटना गुरुवारी सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच बागेपल्ली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या १२ ही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.या अपघाताचे नेमकं कारण समोर आलं नाही. याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पण दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त कार आणि ट्रकला रस्त्याच्या बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळित करण्यात आली. दरम्यान, कर्नाटकामध्ये मंगळवारी म्हणजे २४ ऑक्टोबरला देखील भीषण अपघाताची घटना घडली होती. भरधाव ट्रेनने दोन भावांसह ३ दिव्यांग मुलांना धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होतो.

COMMENTS