Homeताज्या बातम्यामनोरंजन

ईशांत शर्माच्या घरी झालं गोडस कन्येचं आगमन

मुंबई प्रतिनिधी - भारतीय क्रिकेटर इशांत शर्मा वडील झाला आहे. त्याची पत्नी प्रतिमा सिंह यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. इशांत शर्माने सोशल मीड

जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या दुसर्‍या दिवशी जय हनुमान पतसंस्था टायगर्स हा संघ डॉर्क हॉर्स ठरला
लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन
ऋषभ पंत वर्ल्ड कप आणि आशिया कपमधून बाहेर

मुंबई प्रतिनिधी – भारतीय क्रिकेटर इशांत शर्मा वडील झाला आहे. त्याची पत्नी प्रतिमा सिंह यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. इशांत शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याचवेळी चाहत्यांनी कमेंट करत इशांत शर्माला वडील झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा शुक्रवारी रात्री उशिरा वडिल झाला. इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंह हिने एका मुलीला जन्म दिला. इशांत शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली. इशांतने लिहिले की, आम्हाला आमच्या नवीन सदस्याची ओळख करून देताना खूप आनंद होत आहे.

इशांत शर्माने लिहिले, “एक लहान मुलगी, आश्चर्य, आशा आणि स्वप्नांचे जग, सर्व काही गुलाबी रंगात लपेटले आहे. आमच्या कुटुंबातील सर्वात नवीन सदस्याची ओळख करून देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.” इशांत शर्माच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. कमेंट करताना चाहत्यांनी इशांत शर्माला वडील झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

COMMENTS