Homeताज्या बातम्यादेश

देवाचीच केली लबाड भक्ताने फसवणूक

खात्यात 20 रुपये असतांना दिला 100 कोटींचा चेक दान

विशाखापट्टणम/वृत्तसंस्था ः महाराष्ट्रातील शिर्डी असो की, दक्षिणेतील तिरूपती बालाजी असो, या मंदिरामध्ये भक्तांकडून सढळ हाताने दान दिले जाते. मग त्

सर्वसामान्यांवर कोरोनानंतर ‘महागाई’चे सुल्तानी संकट कोसळलंय!
सिव्हिल जळीतकांड : डॉ. पोखरणा यांना कोण पाठीशी घालतंय ? | LokNews24
युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमती महागण्याची शक्यता

विशाखापट्टणम/वृत्तसंस्था ः महाराष्ट्रातील शिर्डी असो की, दक्षिणेतील तिरूपती बालाजी असो, या मंदिरामध्ये भक्तांकडून सढळ हाताने दान दिले जाते. मग त्याची किंमत 5 कोटी तर कधी 17 कोटींच्या घरात असते. मात्र आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधील सिंहाचलम टेकडीवर असलेल्या श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात एका भक्ताने चक्क देवाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भक्ताच्या खात्यात केवळ 20 रुपये असतांना, या भक्ताने मंदिराच्या दानपेटीत 100 कोटी रुपयांचा चेक टाकल्याचे समोर आले आहे.
मात्र हा चेक मंदिर प्रशासनाच्या वतीने संबंधित बँकेत पाठवला असता भक्ताच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम पाहून अधिकार्‍यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. भक्ताच्या खात्यात फक्त 17 रुपये शिल्लक रक्कम होती. यानंतर या चेकचा फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चेकवर बोड्डेपल्ली राधाकृष्ण नावाच्या व्यक्तीची स्वाक्षरी आढळून आली. मात्र, त्या व्यक्तीने या चेकवर कोणतीही तारीख टाकलेली नाही. दरम्यान, चेक पाहिल्यानंतर देवाची फसवणूक करणार्‍याचे बँक खाते विशाखापट्टणम येथील कोटक महिंद्रा बँकेत असल्याचे समजते. विशाखापट्टणमचे श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिर प्रशासनाच्या अधिकार्‍यांना दानपेटीत चेक आढळून आल्यावर त्यांनी तो कार्यकारी अधिकार्‍यांकडे नेला. चेक पाहिल्यानंतरच त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी संबंधित बँकेच्या शाखेतील अधिकार्‍यांना देणगीदाराच्या खात्यात खरोखर 100 कोटी रुपये आहेत का? ते तपासण्यास सांगितले. बँकेच्या अधिकार्‍यांनी मंदिर प्रशासनाला सांगितले की, ज्या व्यक्तीने चेक जारी केला त्याच्या खात्यात फक्त 17 रुपये आहेत. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर आता मंदिर प्रशासन दानपेटीत 100 कोटींचा चेक देणार्‍या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बँकेची मदत घेणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, जर मंदिर अधिकार्‍यांची फसवणूक करण्याचा त्या व्यक्तीचा हेतू असेल, तर त्याच्याविरुद्ध चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेकडे अपील केले जाऊ शकते.

COMMENTS