Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची खुर्ची वाचली

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः अहमनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अटी तटीची लढाई देवून का होईना पण स्वतःची खुर्ची वाचविण्यात यश मिळविले आहे.

पोलिसांनी जप्त केली 49 शस्त्रे आणि पकडले 130 जणांना ; मागील दहा महिन्यांची कामगिरी, 55 गुन्हेही दाखल
संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभेचा समारोप

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः अहमनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अटी तटीची लढाई देवून का होईना पण स्वतःची खुर्ची वाचविण्यात यश मिळविले आहे. राहुरी तालुक्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी महसुल विभागाच्या क्रीडा स्पर्धा शुभारंभ जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शुभारंभानंतर संगितखुर्चीचा खेळ घेण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी,यांच्यासह 14 तालुक्यांचे तहसिलदार व महसुल विभागाचे कर्मचारी राहुरीचे पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे आदींनी संगित खुर्चीत सहभाग झाले होते.

             संगीत खुर्चीचा पहिली फेरी सुरवात झाली. त्यामध्ये राहुरीचे पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे बाद झाले. त्यानंतर संगी खुर्चीत अटी तटीची लढाई सुरु झाली. क्रमाक्रमांकाने प्रत्येक फेरीत एक एक अधिकारी संगित खुर्चीतुन बाद होत गेला. मात्र जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मात्र शेवट पर्यंत चिकाटीने खेळखेळत संगीत खुर्चीत आपली खुर्ची वाचविण्यात यश मिळविले. जिल्हाधिकारी भोसले संगीत खुर्चीत विजय मिळविल्यानंतर महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी एकच जल्लोष केला. महसुल विभागाच्या क्रिडा स्पर्धेत का होईना जिल्हाधिकारी भोसले यांनी स्वतःची खुर्ची वाचविल्याची चर्चा क्रिडा मेदानावर चांगलीच रंगली होती.शेवटी अनेक अधिकार्‍यांनी साहेबांनी खुर्ची वाचविली असे म्हटल्याने अनेक जण कुतुहलाने साहेबांची खुर्ची धोक्यात सापडली होती का असा प्रती प्रश्‍न करु लागले. साहेबांनी खुर्ची वाचविल्याचा आनंद इतर अधिकार्‍यांच्या चेहर्‍यावरुन ओसळंडून वाहत होता.

COMMENTS