Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. राजश्री अहिरराव यांनी दिला तहसीलदार पदाचा राजीनामा  

नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी विधानस

“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…”
चक्क आई-वडिलांनीच केला दोन अल्पवयीन मुलींचा त्याग DAINIK LOKMNTHAN
पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना रस्ते ग्रामस्थांसाठी केले की राजकीय गुत्तेदार पोसण्यासाठी ? :- डॉ.गणेश ढवळे

नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघातून लढण्यास अहिरराव इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला असून, या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. राजीनामा मंजूर झाला की भूमिका स्पष्ट करू, असे डॉ. अहिरराव यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. अहिरराव गेली अनेक वर्षे महसूल विभागात कार्यरत आहेत. त्यांनी नाशिक तहसीलदारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. सध्या त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदारपदाची जबाबदारी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी डॉ. अहिरराव यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी त्या वेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर सातत्याने त्यांनी देवळाली मतदारसंघातील लोकांशी संपर्क वाढेल, याची काळजी घेतली. ग्रामीण भागातील रहिवाशांना आवश्यक मदत करणे, सरकारी कार्यालयांत अडकलेली कामे मार्गी लावून देणे, त्यांना सरकारी  योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देणे अशी मदत त्यांच्याकडून सुरू होती. मतदारसंघाची बांधणी आणि निवडणुकीची तयारी करता यावी, यासाठी नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याचा निर्णय डॉ. अहिरराव यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महसूल आणि वन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे राजीनामा पाठविला असून, तो मंजूर करावा अशी विनंती केली आहे.

मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. राजकारणात सक्रिय होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राजीनामा मंजूर झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करीन. डॉ. राजश्री अहिरराव, तहसीलदार

COMMENTS