Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दाभोळकरांच्या हत्येतील दारूगोळा खडकीच्या कारखान्यातील ?

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या होवून तब्बल एक दशकाचा कालावधी उलटला असला तरी,

शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल
विद्यार्थ्यांनी स्वता: ची ओळख निर्माण करावी अ‍ॅड.अस्मिता मोरे यांचे प्रतिपादन
पोलिस भरती चाचणीनंतर तरूणाचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या होवून तब्बल एक दशकाचा कालावधी उलटला असला तरी, त्यांच्या हत्येतील मारेकर्‍यांचा शोध लागलेला नाही. मात्र त्यांच्यावर झाडलेल्या गोळ्या या पुण्यातील खडकी येथील दारुगोळा कारखान्यामधील होत्या. मात्र, या गोळ्या कारखान्यातून बाहेर कशा आल्या, याचा तपास सीबीआयमार्फत करण्यात आला नाही, अशी माहिती सीबीआय तत्कालीन तपास अधिकारी एस. आर सिंग यांनी दिली.
कोर्टात त्यांची बचाव पक्षाच्या उलटतपासणी करण्यात आली. यावेळी वरील माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयचे त्या वेळेचे प्रमुख सिंग यांची विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या या खडकी दारुगोळा कारखान्यामधील होत्या. या बाबत तपास यंत्रणेला माहिती होती. मात्र, या गोळ्या बाहेर कशा आल्या याचा तपास करण्यात आला नव्हता. या बाबत सिंग यांची अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी उलटतपासणी करत जबाब विचारला. यावेळी त्यांनी तपास केला नसल्याचे सिंग यांनी सांगितले. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते, हे खरे आहे का असे बचाव पक्षाने विचारले असता त्यांनी गोळ्या झाडल्या असे माझे म्हणणे नव्हते. ते केवळ संशयित असल्याची माहिती सिंग यांनी कोर्टाला दिली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्यातील दोनच साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखवण्यात आली आहे. इतर साक्षीदारांना छायाचित्रे का दाखविली नाहीत, याचे सांगता येणार नसल्याचे देखील सिंग म्हणाले. दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे येरवडा कारागृहात होते हे माहिती होते. सगळे साक्षीदारही पुण्यातीलच आहेत, याची देखील माहिती होती. पण, मी त्यांची कारागृहातील ओळख परेड देखील केली नव्हती. या सोबतच खंडेलवाल आणि नागोरीला आम्ही क्लीन चीट दिली नाही असे त्यांनी सांगितले.

COMMENTS