Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्या ः नागरे

कोपरगाव प्रतिनिधी ः बियाणे व खतांसाठी मोठा खर्च करूनही हा हंगाम वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने सर्व सरसकट

राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूमन कमविले कोटयवधींची माया ?
भाजपच्या उत्तर विभाग उपाध्यक्षपदी पानसरे यांची नियुक्ती
शिक्षक बँक सत्ताधार्‍यांनी 24 कोटींचा हिशेब लपवला ; गुरुमाऊलीच्या एका गटाचा आरोप

कोपरगाव प्रतिनिधी ः बियाणे व खतांसाठी मोठा खर्च करूनही हा हंगाम वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने सर्व सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना मोठी भरीव मदत करावी. अशी मागणी कोपरगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी लेखीपत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

तालुक्यात दुष्काळाचे संकट पुन्हा एकदा गडद होत आहे. तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरीही तालुक्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी कोरडा गेला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली बहुसंख्य उभी पिके ही जळण्याच्या मार्गावर आहेत. बहुसंख्य शेतकर्‍यांनी खते व बीबियाणांवर खर्च करून खरिपाची पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा मोठा खर्च झालाय पण आता शेतात जाऊन पाहिले तर संपूर्ण पीक जळून जात असल्याचे चित्र पाहायला मिळेल.

नुकतेच कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासह अधिकारी यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न झाला.यात शेतकर्‍यांना मदत करणार असल्याचे जाहीर केले. परंतु सर्व परिस्थिती बघता आताच दुष्काळ पडला आहे. शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने केलेल्या घोषणांवर शेतकर्‍यांना अवलंबून न ठेवता तातडीने शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेवून मदत करणे गरजेचं आहे. कारण शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके आता डोळ्यादेखत जळून चालली आहे. सरकारने घोषणा करुन देखील कोपरगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात असताना कांदा पिकाचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. तातडीने कांदा पिकाचे अनुदान सरकारने शेतकर्‍यांना द्यावे. अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल. असा इशाराही कोपरगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिला आहे.

COMMENTS