अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र समिती कार्यालय अहमदनगर येथे व्हावे -अमित आगलावे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र समिती कार्यालय अहमदनगर येथे व्हावे -अमित आगलावे

 अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र समिती कार्यालय अहमदनगर येथे व्हावे अशा आशयाचे निवेदन नुकतेच  आदिवासी महादेव कोळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अहमदनगर यांच्या शिष्टमंडळाने नामदार प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना समक्ष भेटून दिले.

सद्गगुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात
Ahmednagar : नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Video)
अहमदनगरमध्ये दहा दिवसांत 2 हजार 740 वीज जोडण्या




कोपरगाव शहर प्रतिनिधी-   अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र समिती कार्यालय अहमदनगर येथे व्हावे अशा आशयाचे निवेदन नुकतेच  आदिवासी महादेव कोळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अहमदनगर यांच्या शिष्टमंडळाने नामदार प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना समक्ष भेटून दिले.
या निवेदनात  महाविकास आघाडीच्या सरकारने आदिवासी बांधवांच्या हितासाठी आदिवासी लोकसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यासाठी जिल्हावार जात पडताळणी समित्या स्थापन करण्याचे आदेश दि १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पारित केले त्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी सरकारचे आभार मानले मात्र प्रशासनाने संबंधित आदेशात बदल करून पूर्वीप्रमाणेच अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती नाशिक येथे नाशिक-२ या नावाने समिती स्थापन करण्याचे आदेश काढले. व त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सात तालुके जोडून दिले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासाठी स्थापन झालेली अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती नाशिक 2 ही अहमदनगर जिल्ह्यात न येता नाशिक येथे करण्यासंदर्भात आदेश काढले. सध्याही अहमदनगर जिल्ह्यातील चार लाख आदिवासी बांधवांना जात पडताळणीसाठी  आदिवासी विकास भवन नाशिक येथे जावे लागते. सदर अंतर शंभर ते दोनशे किलोमीटर आहे .आदिवासी बांधव वगळता सर्व समाजाला प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी समिती आहेत मात्र गोरगरीब आदिवासी बांधवांना विनाकारण पर जिल्ह्यात जावे लागते.तसेच प्रशासनाने केलेला बदल रद्द करत फक्त अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना अंतर जिल्ह्यातच जात पडताळणी कार्यालय असावे,या सर्व बाबी माननीय मंत्री प्राजक्त  तनपुरे यांची राहुरी येथे प्रत्यक्ष भेट घेऊन आदिवासी महादेव कोळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अहमदनगर यांच्या शिष्टमंडळाने मंत्री तनपुरे यांना अवगत केले. यावेळी मंत्री तनपुरे यांनी आदिवासी बांधवांना लवकरच अहमदनगर जिल्ह्यात अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळात  अमित आगलावे ,सुनिल पवार ,विजय महांडुळे, दिलीप सोनवणे, नीलेश राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS