गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसापासून अटकेची टांगती तलवार असलेले भाजप नेते गणेश नाईक यांना बुधवारी न्यायालयाने दिलासा दिला. नाईक यांच्या अटकपूर्व

राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी
लोणंदमध्ये तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; आरोग्य विभागालाच सलाईनसह इंजेक्शनची गरज
राज्यात 75 हजार पदांची भरती रेंगाळणार !

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसापासून अटकेची टांगती तलवार असलेले भाजप नेते गणेश नाईक यांना बुधवारी न्यायालयाने दिलासा दिला. नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, न्यायालयाने गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा दावा करणार्‍या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्यासोबत 27 वर्ष लिव्ह इनमध्ये राहून त्यांच्याकडून मला एक मुलगा आहे, परंतु ते त्याचा स्वीकार करण्यास नकार देत असल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नाईकांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS