Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाद्य पदार्थ पॅकींगसाठी वृत्तपत्राचा वापर टाळण्याचे आवाहन

म्हसवड / वार्ताहर : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात 5/08/2011 पासुन लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश ज

मेणी जलसेतुला मोठी गळती : शेतीला तळ्याचे स्वरुप
चक्कर येवूनही चालकाचे प्रसंगावधान; बस शेतात घालून प्रवाशी सुरक्षित
पहिल्या पावसातच फलटण बस स्थानक बनले पाण्याचे तळे

म्हसवड / वार्ताहर : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात 5/08/2011 पासुन लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन् उपल्ब्ध करुन देणे हा आहे. अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो. त्यावेळी अन् व्यवसायिक हे वडापाव, पोहे या सारखे अन् पदार्थ वर्तमानपत्रामध्ये बांधून देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही रसायनापासून बनवलेली असते. (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या रसायनाचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात.
अशा न्युजपेपरमध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण भारत सरकार यांनी दि. 6/12/2016 आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तरी सर्व अन् व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेत्यांना सुचित करण्यात येते की, वृत्तपत्रामध्ये अन् पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे. अन्यथा आपणाविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कारवाई घेण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शि. स. देसाई यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

COMMENTS