Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘काळू-बाळू’सह 6 मातब्बरांचे तमाशाचे फड बंद

सांगली / प्रतिनिधी : तमाशा उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा दिल्लीच्या तख्ताचीही वाहवा मिळविणारा तब्बल 50 वर्षे या कला प्रकारावर हुकूमत गाजविणारे

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे खरे सुत्रधार कोण?
पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे
किसन वीर मध्ये सत्तांतर; सत्ताधारी पॅनेलचा धुरळा

सांगली / प्रतिनिधी : तमाशा उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा दिल्लीच्या तख्ताचीही वाहवा मिळविणारा तब्बल 50 वर्षे या कला प्रकारावर हुकूमत गाजविणारे कवलापूर (ता. मिरज, जि. सांगली) येथील ‘काळू-बाळू’सह राज्यातील सहा मोठे तमाशाचे फड बंद पडले आहेत. दोन वर्षे कोरोना प्रेक्षकांची पाठ व डिझेलच्या वाढत्या दरामुळे हे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी केवळ आठच फड विजया दशमीला (दसरा) रिवाजानुसार लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. पण पावसाचा त्यांना जबरदस्त फटका बसला आहे. एक-दोन शो करून हे फड विदर्भ आणि खानदेशात बसून आहेत.
तमाशा हेच दैवत मानून आपल्या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेणारे जवळपास 225 लहान-मोठे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रत्येकवर्षी विजया दशमीला सर्व फड बाहेर पडतात. तत्पूर्वी महिनाभर कलाकारांची जुळवा-जुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरूस्ती, लाईट व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी किमान 15 ते 20 लाख रुपये लागतात. दरवर्षी सावकाराकडून कर्ज काढून ही रक्कम उभी केली जाते.
काळू-बाळूसह, अंजली नाशिककर, भिका-भीमा सांगवीकर, कुंदा पाटील-पिंपळेकर, चंद्रकांत ढवळीपूरकर, दत्ता महाडिक-पुणेकर हे सहा तमाशांचे फड बंद आहेत. 80 रुपये तिकीट दर आहे. तिकीट काढून तमाशा पाहण्यास येणारा प्रेक्षक खूपच कमी झाला आहे. केवळ 35 ते 40 प्रेक्षकच येतात. यातून जमा होणार्‍या गल्ल्यातून काहीच भागत नाही. त्यामुळे हे फड बंद ठेवले आहेत. अर्थकारण बिघडल्याने ते आता जानेवारीत बाहेर पडण्याचे नियोजन करत आहेत. गावोगावच्या यात्रा सुरू होतात. यात्रा कमिटीकडून ‘सुपारी’ घेऊन शो करण्याचा निर्णय या सहा फड मालकांनी घेतला आहे.
यावर्षी विजया दशमीला मंगल बनसोडे, रघुवीर खेडकर, मालती इनामदार, हरिभाऊ बडे, आनंद महाजन, विठाबाई नारायणगावकर, पांडुरंग मुळे, तुकाराम खेडकर-मांजरवाडीकर हे आठच फड लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. मोठ्या फडामध्ये 80 ते 110 कलाकार असतात.
चैत्र महिन्यात पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे ‘सुपारी’ घेण्यासाठी फड मालक एकत्रित येतात. तत्पूर्वी दिवाळीनंतर सांगली जिल्ह्यातील विटा-मायणी रस्त्यावर राहुट्या मारून ‘सुपारी’ घेतल्या जातात. लहान दीडशे तमाशा फड आहेत. ते केवळ चैत्र महिन्यातील यात्रांचा हंगाम करतात. तेही आर्थिक संकटात सापडले आहेत.

COMMENTS