Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दहा कोटीं रुपयांचा निधी मंजूर

खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नांना आले यश

अकोले /प्रतिनिधी ः अकोले शहराच्या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठीही सीसीटीव्ही

कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभेचा समारोप
आत्मा मालिकचा विश्‍वजीत देवकर देशात प्रथम
पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क ढीगभर घाण | पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24

अकोले /प्रतिनिधी ः अकोले शहराच्या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठीही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे दहा कोटींचा निधी मंजुर झाला आहे. अशी माहिती खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी दिली. खासदार लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देवळाली प्रवरा शहरातील कल्पना चावला उद्यान, आदिनाथ वसाहत येथे संगीत कारंजा विकसित करणे. त्याकामी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर देवळाली प्रवरा क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित करण्यासाठी एक कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच श्रीरामपूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.अकोले नगरपंचायत यादीमध्ये देखील याच यंत्रणेसाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी व कोपरगाव नगरपंचायत हद्दीमध्ये देखील एक लाख वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच संत गाडगेबाबा उद्यान श्रीरामपूर येथे म्युझिकल फाउंटन संगीत कारंजा विकसित करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी खासदार लोखंडे यांच्ंया माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. या कामांच्या मंजुरीसाठी खासदार लोखंडे यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले होते. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे सदरील गावांमधील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS