Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूधगंगा सहकारी पतसंस्थेत 80 कोटींचा आर्थिक घोटाळा

पतसंस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे भाऊसाहेब कुटे यांच्यासह 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर/प्रतिनिधी ः सहकारातील बहुचर्चित ठरलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अखेरीस संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह

पेट्रोलपंप कामगाराने मालकाला घातला 28 लाखांचा गंडा
दहा द्राक्ष बागायतदारांना जयपूरच्या व्यापाऱ्याकडून गंडा 
बनावट कागदत्रांद्वारे बँकेकडून 18 लाखांचे कर्ज

संगमनेर/प्रतिनिधी ः सहकारातील बहुचर्चित ठरलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अखेरीस संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील नावाजलेली आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटी 89 लाख 41 हजार 981 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नाशिकच्या सनदी लेखापालानेही सहकार्य केल्याने त्याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपीमध्ये बड्या राजकीय नेत्यासह त्याच्या नातेवाईकांचा समावेश असल्याने पोलीस त्यांना अटक करतात की जामिनासाठी संधी देतात हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान या प्रकारामुळे संगमनेरच्या दिशादर्शक सहकारावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीमध्ये भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांच्या परिवारातील दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे (सर्व रा. गणपतीमळा, सुकेवाडी, संगमनेर) यांच्यासह भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (संगमनेर), चेतन नागराज कपाटे (रा. पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर), कृष्णराव श्रीपतराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), प्रमिला कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), अजित कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), संदिप दगडु जरे (रा. भूतकरवाडी सावेडी, ता. नगर), लहानु गणपत कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), उल्हास रावसाहेब थोरात रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, ता. संगमनेर), अरुण के. बुरड (रा. नयनतारा सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांचा समावेश आहे. यापैकी लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल क्षीरसागर यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी मात्र पसार झाल्याचे समजते.
सुमारे दोन वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराचे प्रकरणाची चर्चा सुरु होती. सतर्क सभासद, ठेवीदारांचे विविध प्रकारचे आंदोलन, निवेदने यामुळे दूधगंगा अपहार प्रकरण शहरासह तालुक्यात चर्चेत होते. आरोप प्रत्यारोप आणि आश्‍वासने यांची देवाण-घेवाण चालू होती. राजकीय दबावामुळे कायदेशीर कारवाई मात्र होत नसल्याचीदेखील चर्चा होती. मात्र गेल्या आठवड्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शासकीय परवानगी मिळताच नगरचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक राजेंद्र फकिरा निकम यांनी शनिवारी मध्यरात्री दिलेल्या फिर्यादीवरुन पतसंस्थेच्या 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्ष, व्यवस्थापक, कर्जदार आणि त्यांना मदत करणार्‍या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2016 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीतील हा गुन्हा घडल्याचे म्हटले आहे. शहर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 420, 408, 409, 465, 467, 471, 477(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS