Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीत गौतम बँक सेवा देणार ः आमदार काळे

गौतम बँकेच्या सभासदांना मिळणार 6 टक्के लाभांश

कोपरगाव/प्रतिनिधी ः नागरी सहकारी बँकांना रिझर्व बँकेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून राष्ट्रीय बँका ग्राहकांना देत असलेल्या सेवा अशा अनेक

महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून दमदाटी, गुन्हा दाखल
आ. निलेश लंकेंची सातासमुद्रापार दखल, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मान l पहा LokNews24
करुणा मुंडे राजकारणात उतरून धनंजय मुंडेंविरोधात लढणार…; नगरला केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा

कोपरगाव/प्रतिनिधी ः नागरी सहकारी बँकांना रिझर्व बँकेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून राष्ट्रीय बँका ग्राहकांना देत असलेल्या सेवा अशा अनेक आवाहनात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करून गौतम बँकेने केलेली प्रगती अभिमानास्पद आहे. यावर्षी सभासदांना 6 टक्के लाभांश देण्याबरोबरच गौतम बँक ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने सर्व प्रकारच्या सेवा देणार आहे. असे गौरवोद्गार आ.आशुतोष काळे यांनी काढले.

सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक गरजा भागवणार्‍या गौतम सहकारी बँकेची 2022-23 या वर्षाची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (दि.19) रोजी बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकचे चेअरमन सुधाकर दंडवते होते.

यावेळी आ.काळे म्हणाले की,जागतीक महामारीमुळे निर्माण झालेली कॅशलेस व्यवहार प्रणाली आणि त्या अनुषंगाने डिजीटल बँकिंग प्रणालीचे वाढलेले महत्व हे नागरी बँकांना मोठे आवाहन आहे. सुधारित बँकींग रेग्युलेशन क्ट 1949 हा सन 2020 मध्ये सहकारी बँकामध्ये सुधारणा करण्याचे दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सहकारी बँकिंग कायद्यामध्ये अमुलाग्र बदल झालेला असून नागरी बँकांनी कायद्यांमधील तरतुदीनुसार काटेकोरपणे कामकाज करावयाचे आहे.ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था सुधारणेसाठी गौतम बँकेने आपली भुमिका अत्यंत सक्षमपणे निभावली. हे सहकार चळवळीच्या दुष्टीने नक्कीच अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील सक्षम बँक म्हणून आजवर गौतम बँकेस अनेक पुरस्कार बँकेस मिळालेले असून सन 2023 चा राज्य पातळीवरील बॅको ब्ल्यू रिबन पुरस्कार देखील नुकताच जाहीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर, नासिक,ठाणे, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या गौतम बँकेचे नगर जिल्ह्यात सहा व नासिक जिल्ह्यात एक अशा बँकेच्या एकूण 7 शाखा सक्षमपणे सुरु असून अजून एक शाखा काढण्यासाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच मंजुरी मिळू शकते. असा विश्‍वास व्यक्त केला आहे. दि.31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात गौतम सहकारी बँकेच्या ठेवी 106 कोटीच्या पुढे असून 66 कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना लघु व कुटीर उद्योग व्यवसाय शेती व शेती पूरक व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून जवळ जवळ 45 कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले असून ह्या कर्ज वाटपात सहकारी बँकांमध्ये गौतम बँक राज्यात अव्वलस्थानी आहे. बँकेची सन 2022-23 चे वर्षाअखेरीस गुंतवणूक 51 कोटी 77 लाख, ढोबळ नफा 4 कोटी 16 लाख 21 हजार रुपये, तर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रू.52 लाख 48 हजार इतका झालेला आहे. बँकेचे सी आर ए आर प्रमाण 17.89% असून नेटवर्थ 10 कोटी 9 लाख इतके आहे. बँकेचे खेळते भांडवल 130 कोटी 75 लाख 6 हजार इतके आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण 1.64% इतके आहे. आर्थिक वर्ष 2022-23 चे आर्थिक स्थितीनुसार बँक रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बँकेचे (ऋडथच्) सर्व निकष पूर्ण करत आहे. बँकेला अहवाल सालात ऑडीट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी रिझर्व बँकेच्या नियमांची पूर्तता केल्यामुळे यावर्षी सभासदांना लाभांश देता येणार आहे याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया :- कोरोना महामारीपासून प्रत्येक बँकेच्या ग्राहकाला कॅशलेस व्यवहाराची सवय लागली असून, नागरी सहकारी बँकांना हे आवाहन स्विकारावे लागणार आहे. त्यामुळे लवकरच गौतम बँकेचे शाखा गौतमनगर व कोपरगाव शाखेमध्ये एटीएम मशीन बसविणार असून नुकतीच रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे.राष्ट्रीयकृत बँकेत मिळणार्‍या ऑनलाईन बँकिंग सेवा देखील गौतम बँकेच्या ग्राहकांना मिळणार आहे. गौतम बँक प्रगतीबरोबरच आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.- आ.आशुतोष काळे.

COMMENTS