चार गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस बाळगणारे चार आरोपी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस बाळगणारे चार आरोपी जेरबंद

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणा - या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्

देवरेंविरोधात आंदोलनाचा पीपल्स हेल्पलाईनचा इशारा
विठ्ठलराव डव्हाण यांनी दिली अभ्यासिकेसाठी देणगी
माजी आमदार पिचड यांच्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू


अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणा – या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बी . जी . शेखर पाटील , तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यातील गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते . वरील सुचना प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात गावठीकट्टे बाळगणारे व विक्री करणा – या गुन्हेगारांची माहिती घेवुन कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमले होते . सदर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे , पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , सहाय्यक फौजदार मन्सुर शेख , पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , संदीप पवार , भाऊसाहेब कुरुंद , मनोहर गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , संदीप घोडके , पोलीस नाईक शंकर चौधरी , देवेंद्र शेलार , रविकिरण सोनटक्के , दिपक शिंदे , लक्ष्मण खोकले पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट , योगेश सातपुते , मेघराज कोल्हे , रविंद्र घुगांसे , सागर ससाणे , रणजित जाधव , रोहित येमुल , चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे असे अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणारे आरोपींचा शोध घेत होते . त्यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे हद्दीत पाथर्डी येथील जुने बस स्टॅण्ड जवळ , एक इसम गावठीकट्टा विक्री करण्याचे उद्देशाने संशयीतरित्या फिरत असताना आढळुन आला , त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) छोट्या ऊर्फ सोहेल राजु पठाण वय २२ , रा . मेहेरबाबा टेकडी , ता . पाथर्डी असे असल्याचे सांगितले . त्यास अधिक विश्वासात घेवुन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस असे एकुण २५,६०० / – रु . किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९ ३३ / २०२१ आर्म अॅक्ट ३ / २५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे . तसेच तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपोवन रोड येथील सागर चिकन शॉपचे शेजारी एक इसम गावठीकट्टा विक्री करण्याचे उद्देशाने संशयीतरित्या उभा असताना आढळुन आला . त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १ ) मनोज लक्ष्मण झगरे वय ३० , रा . गुंडू गोडावुन पाठीमागे , तपोवन , अहमदनगर असे असल्याचे सांगितले . त्यास अधिक विश्वासात घेवुन , पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस असे एकुण २५,६०० / – रु . किंमतीचे मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १०५५/२०२१ आर्म अॅक्ट ३ / २५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे       तसेच कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एमएसईबी ऑफिस जवळ , राजश्री हॉटेल समोर , स खोली , नगरकॉलेजच्या कम्पाऊंडच्या बाजुला कोठी , अहमदनगर येथे दोन इसम गावठीकट्टा विक्री करण्याचे उद्देशाने संशयीत रित्या फिरत असताना आढळुन आले . त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव , गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १ ) गणेश अरुण घोरपडे वय ३५ रा . सिध्दार्थ नगर , अहमदनगर व २ ) राहुल श्रीरंग आडागळे वय ३० रा . सिध्दार्थ नगर , अहमदनगर असे असल्याचे सांगितले . त्यांना अधिक विश्वासात घेवुन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये दोन देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस असे एकुण ५५,६०० / – रु . किंमतीचे मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. ९ ०५ / २०२१ आर्म अॅक्ट ३ / २५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे . वरील प्रमाणे कोतवाली , तोफखाना व पाथर्डी पोलीस स्टेशनचे हद्दीत एकुण ०४ आरोपी चार गावठीकट्टे व सहा जिवंत काडतुसासह एकुण १,०६,८०० / – रु . किंमतीचे मुद्देमालासह विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आले आहेत . सदरची कारवाई. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र  बी . जी . शेखर पाटील , पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांचे सुचना व मार्गदर्शना खाली अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल  , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके , उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

COMMENTS