Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्त्रीवाद ही समानतेची चळवळ ः डॉ गिताली

पुणे ः स्त्रीवादी चळवळीला पुरूषविरोधी चळवळीचा मुखवटा देऊन नाहक बदनाम करण्याचे काम केले जात आहे. स्त्रीवादी चळवळ ही पुरूषांविरोधीची चळवळ नसून ही स

 कल्याण शीळ रोड नागपूरच्या धर्तीवर डबल डेकर करणार – श्रीकांत शिंदे 
सहज ध्यानाने कौटुंबिक स्वास्थ लाभते – सौ. सविता सोनवणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटला कुलप कोणाचे ?

पुणे ः स्त्रीवादी चळवळीला पुरूषविरोधी चळवळीचा मुखवटा देऊन नाहक बदनाम करण्याचे काम केले जात आहे. स्त्रीवादी चळवळ ही पुरूषांविरोधीची चळवळ नसून ही समानतेची लढाई आहे, असे मत प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि संपादक डॉ. गिताली वि. मं. यांनी व्यक्त केले. दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि सुनीता ओगले लिखित ’सोलमेट’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. एस.एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर नाट्य चित्रपट सृष्टीतील अभिनेते आनंद इंगळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखिका सुनीता ओगले आणि दिलीपराज प्रकाशनाच्या मधुमिता बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गिताली वि. मं. म्हणाल्या की, राजसत्ता असो की कुटुंबसत्ता. त्या सत्तेचे विकेंद्रीकरण होणे स्त्रीवादी चळवळीला अपेक्षित आहे. सत्तेच्या या विकेंद्रीकरणासाठी माणसे बौध्दीक, मानसिक आणि भावनिक पातळीवर समृद्ध होणे आवश्यक आहे. लोकशाही आणि संविधान वाटवायचे असेल, तर स्वतःपुरता विचार करून चालणार नाही. परिवर्तनासाठी रस्त्यावर उतरून चळवळी करणे आवश्यक आहे. स्त्री आणि पुरूष शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वेगळे असले तरी त्या वेगळेपणाचे विषमतेमध्ये रूपांतर न होता आपापसात मैत्रभाव जागा होणे आवश्यक आहे. स्त्री चळवळीभोवती नाहक एक चक्रव्यूह गुंफले गेले असून स्त्रीवादी चळवळीतील महिला या स्वैराचारी, उध्दट आणि परंपरेला प्रश्‍न विचारणार्‍या अशा दृष्टीकोनातून पाहिले जाते.

COMMENTS