Homeताज्या बातम्यादेश

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन

चंदीगड : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख नेते ओम प्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. चौटाला हे प

वडवणीचा ऐतिहासिक एल्गार; शेतकर्‍यांनीच ठरवला दुधाचा भाव, 19 जूनपासून 80 रुपये लिटरतुकाराम मुंडे यांच्या भेसळविरोधी कारवाईनंतर दूध उत्पादक एकवटले; सरकारकडे भाव मागणार नाही, आता आपणच भाव ठरवणार असा निर्धार
 महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेला अतिष तोडकर याचे मुळ गावी जंगी स्वागत 
सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्या ः नागरे

चंदीगड : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख नेते ओम प्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. चौटाला हे पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ते गुरुग्राम येथील त्यांच्या घरी होते.
दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर 11.30 वाजता त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात आणण्यात आले. सुमारे अर्ध्या तासानंतर दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मुख्यमंत्री असताना 1999 ते 2000 या काळात चौटाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची भरती केली. या प्रकरणी सीबीआयने चौटाला आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध 6 जून 2008 मध्ये विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 16 जानेवारी 2013 रोजी यांच्यासह त्यांचा मुलगा अजय चौटाला व इतर 53 जणांना न्यायालयात दोषी ठरविले गेले व अटक करण्यात आली. 22 जानेवारी 2013 रोजी न्यायालयाने यांना दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.

COMMENTS