Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर : पद्मश्री अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात

मुक्त विद्यापीठाचा अप्रेंटिसशिप बोर्ड सोबत सामंजस्य करार
मदारी समाज घरापासून वंचित ; ससे होलपट केव्हा थांबणार ? अँड अरूण जाधव
सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा : पालकमंत्री नितेश राणे

सोलापूर : पद्मश्री अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून चित्तमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व दर्शन घेतले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामाजिक वनीकरणचे अजित शिंदे, मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, साहित्यिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS