Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये प्रथमच राष्ट्रीय पातळीवर नॅशनल रॉ बेंच प्रेस अँड डेड लिफ्ट चॅम्पियनशिप कॉम्पिटिशनचे मानवधन संस्थेत आयोजन

नाशिक प्रतिनिधी - बलशाली भारतासाठी प्रथमच नाशिक जिल्ह्यात  नॅशनल रॉब बेंच प्रेस अँड डेड लिफ्ट चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन ही राष्ट्रीय स्तरावरील

मद्यपी पोलिसांची नागरिकांना मारहाण | LOKNews24
मुंबई विद्यापीठाला आण्णाभाऊ साठेंचे नाव द्या
नागपूरात 24 तासामध्ये तिघांची हत्या

नाशिक प्रतिनिधी – बलशाली भारतासाठी प्रथमच नाशिक जिल्ह्यात  नॅशनल रॉब बेंच प्रेस अँड डेड लिफ्ट चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा  संपन्न झाली. पॉवर लिफ्टर असोसिएशन जिल्हा नाशिक आणि मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्वरूपातील ही स्पर्धा प्रथमच नाशिकमध्ये मानवधन संस्थेच्या धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक शाळा पाथर्डी फाटा येथे येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये भारत देशातून हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तरं प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू या  राज्यातील स्पर्धकांनी मोठया संख्येने  सहभाग नोंदविला.. सलग तीन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानवधन संस्थेचे संस्थापक श्री. प्रकाश दादा कोल्हे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. गोरख भाऊ बोडके जिल्हा परिषद सदस्य,जिम इक्विपमेंटचे संचालक श्री. सागर सानप, वैष्णव कन्स्ट्रक्शनचे श्री. सतीश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. देशाचे खरे संसाधन म्हणजेच मानवी संपदा असल्याने सशक्त भारत , समृद्ध भारत, बलशाली भारत घडविण्यासाठी क्रीडाक्षेत्रास अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात घेऊनच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धकांमधील ओज व चुरस अवर्णनीय असून रोमांच उठवणारे ते क्षण चैतन्यदायी व प्रेरणादायी ठरले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्तालय नाशिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश दादा कोल्हे (मानवधन संस्थेचे संस्थेचे संस्थापक) पॉवर लिफ्टर असोसिएशन जिल्हा नाशिक सचिव श्री. विनोद गांगुर्डे, अक्षय रानडे मोहनसिंग राठोड, राष्ट्रिय सचिव श्री एस गोस्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातील मान्यवर म्हणून  अशोक दीक्षित, छत्रपती पुरस्काराने सन्मानित पल्लवी गोस्वामी कुडल वाल्मिकी, श्रीनिवास साहू, हर्षल माने, रविकांत सर, कुणाल गोयल, निरंजन सर, राजा पवार असे नॅशनल रेफ्री ही यावेळी उपस्थित होते.मान्यवरांच्या  हस्ते यशस्वी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह  देऊन सन्मानित करण्यात आले.  या स्पर्धेच्या अपूर्व संधीमुळे बलशाली भारत बनवण्याचे स्वप्न साकार होईल असा निर्वाळा ही यावेळी देण्यात आला. आशय रानडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक मोहिते, अमित कांबळे, सर्व मानवसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS