भाजपा पदाधिकार्यांचा इस्लामपूर पोलीस ठाण्यात ठिय्या : गुन्हा दाखल करण्याची पोलीस निरीक्षक चव्हाण यांची ग्वाहीइस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर व
भाजपा पदाधिकार्यांचा इस्लामपूर पोलीस ठाण्यात ठिय्या : गुन्हा दाखल करण्याची पोलीस निरीक्षक चव्हाण यांची ग्वाही
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची सजवलेली बस शहरातून स्वत: चालविली. त्याचे व्हिडीओ व फोटो सर्वत्र व्हायरल झाले. मात्र, इस्लामपूर भाजपाने यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी स्वत: प्रसिध्दीसाठी व कोणताही अनुभव नसताना बेकायदेशीररित्या बस चालविली आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्या दालनात ठिय्या मांडला. भाजपा पदाधिकार्यांनी आपली भुमिका रास्त मांडत असताना चव्हाण यांनी बरोबर आहे. मला उद्या संध्याकाळपर्यत वेळ द्या मी गुन्हा दाखल करतो, असे आश्वासन दिले. यावर जयंत पाटील यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याबाबतचे निवेदन चव्हाण यांना भाजपा पदाधिकारी यांनी दिले.
वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपुर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना इस्लामपुर शहरातही नागरीकांची मोठी गर्दी होती. जयंत पाटील हे स्वत: च्या प्रसिध्दीसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. बस चालविण्याचा प्रयोग हा बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यांना बस चालविण्याचा कोणताही अनुभव नाही. दुर्दैवाने काही घटना घडली असती तर मोठे नुकसान झाले असते. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता लोकशाहीचा सन्मान करत गुन्हा दाखल करावा. वस्तुस्थिती सोशल व पेपर मिडीयावर प्रसिध्द झाली आहे. तरीही शशीकांत चव्हाण माहिती घेतो, वकीलांचा सल्ला घेतो. असे बेजबाबदारपणे आम्हांला उत्तरे देत आहेत. शेवटी आम्हाला त्यांनी माहिती घेऊन गुरुवार संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्या गुन्हा दाखल झाला नाही तर संपुर्ण इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्ता व नागरीक पोलीस ठाण्यावर मोर्चा काढतील, असा इशारा धैर्यशील मोरे यांनी दिला.
वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, साडेपाच महिने एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरु होते. पण आ. जयंत पाटील तिकडे फिरकले नाहीत. मात्र, सजवलेली बस चालविण्यासाठी सरसाविले हे अत्यंत खेदजनक आहे. चव्हाण यांना सर्व कायदेशीरबाबी व सर्व पुरावे सादर केले आहेत. त्या आधारे हा गुन्हा दाखल करावा.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, जयंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाकडे चालक म्हणुन नियुक्ती नाही. त्यांच्याकडे आरटीओ या सक्षम अधिकार्यांचे बस चालविण्याचा बॅच बिल्ला नसताना जड वहान चालक म्हणून आवश्यक असणारे अनुप्राप्ती नाही. कोणताही अनुभव नसताना इस्लामपूर शहरात बस चालविली. सरकारी व सार्वजनिक वापराचे वाहन चालविणे हि गंभीर बाब आहे. हे लक्षात घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
COMMENTS