Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामसभेबाबत अधिकारीच आले अडचणीत : सुशांत मोरे

सातारा / प्रतिनिधी : 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेतली नाही तर कायद्यात सरपंच अपात्र ठरु शकतो. ग्रामसभेची नोटीस 7 दिवस आधी काढणे, बंधनकारक असताना दि. 2

कराड तालुक्यातील वराडे येथील अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्रासाठी साडेसात कोटी
यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती
गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा / प्रतिनिधी : 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेतली नाही तर कायद्यात सरपंच अपात्र ठरु शकतो. ग्रामसभेची नोटीस 7 दिवस आधी काढणे, बंधनकारक असताना दि. 26 रोजीची सभा घेण्याबाबत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शक सूचना दिल्या नाहीत. राज्यातील सर्व जिल्ह्यात ग्रामसभा घेण्यासाठी सुचना दिल्या आहेत. उद्या सभा होणार आणि त्यासाठी आदल्या दिवशी मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार, हे कर्तव्य शुन्य असलेल्या अधिकार्‍यांमुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या बेजबाबदार अधिकार्‍यांवर जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.
सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग यापेक्षा त्याबाबत असणारी साथ रोग प्रतिबंधात्मक नियमावलीची धास्ती जास्त आहे. शाळा सुरू झाल्या मात्र ग्रामसभा घेण्यासाठी काय करावे, याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी अद्यापही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना कळविले नाही. सभेची सात दिवस आधी नोटीस बजावली पाहिजे, दवंडी दिली पाहिजे. सभा घेण्याची जबाबदारी असणार्‍या सरपंच, ग्रामसेवकांनी काय कार्यवाही करावी, याबाबत जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांनी काहीही मार्गदर्शक सुचना दिल्या नसल्याने आधीच उत्साह त्यात खोडा अशी अवस्था झाली आहे.
अनेक सरपंच, ग्रामसेवकांनी संपर्क करून माहिती घेतली. जिल्हा परिषदेकडून सुचना आल्या नाहीत, त्या येतील, तशीच सभा घेतला जाईल. यातून कायद्याच्या चौकटीत सभा न घेता अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे दि. 26 जानेवारीची सभा होणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या कायद्याचा अवमान असून तो करणार्‍या जिल्हा परिषदेच्या बेजबाबदार अधिकार्‍यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा याविरोधात योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेने सुचना न दिल्याने सर्व ग्रामपंचायतींनी वॉर्डसभा, महिला सभा या कागदोपत्री दाखवल्या असल्याची संशय व्यक्त केला जातो. याला हेच बेजबाबदार अधिकारी जबाबदारी असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे सुशांत मोरे यांनी मागणी केली आहे.

COMMENTS