Homeताज्या बातम्यासंपादकीय

पलटीबाज नितिशकुमार ! 

बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयू नेता नितिशकुमार यांनी पुन्हा एकदा राजीनामा देऊन, भारतीय राजकारणात आता नवी खळबळ आणली आहे. वास्तविक, भारतीय जनता पक्

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
राष्ट्रपतींना सोरेन यांचे पत्र ! 
संसद, लोकांच्या इच्छेचे मूर्त स्वरूप !

बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयू नेता नितिशकुमार यांनी पुन्हा एकदा राजीनामा देऊन, भारतीय राजकारणात आता नवी खळबळ आणली आहे. वास्तविक, भारतीय जनता पक्ष्याच्या धर्मवादी राजकारणाशी फारकत घेत  त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखालील भाजपबरोबरचे सरकार पाडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती करून, त्यासोबतच काँग्रेसला आघाडीत घेऊन, पुन्हा मुख्यमंत्री बनत नवे सरकार बनवले होते. या सरकारला दोन वर्षे होत असतानाच नितिश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन, एनडीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. अर्थात, नितिश कुमार यांचे गेल्या पंचवीस वर्षाचे राजकारण, हे सामाजिक पातळीवर अतिशय धोकेबाजीचे राहिल्याचे दिसते. मागील राष्ट्रपती निवडणुकीच्या दरम्यान देखील त्यांनी काँग्रेस सोबत खलबते केली होती; परंतु, कुठल्याही गोष्टी जमून न आल्यामुळे, त्यांनी मागच्या राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडून भाजप आणि एनडीए आघाडीची साथ केली होती. त्यानंतर स्थापन झालेले जेडीयू – आरजेडीचे सरकार, त्यात काँग्रेसचाही समावेश करून बिहारचे राजकारण स्थिर होत असतानाच, नितीशकुमार यांनी पुन्हा घेतलेली पलटी, ही केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक पातळीवर देखील धक्कादायक मानली जात आहे. अर्थात, नितिश कुमार यांची मानसिकता ही इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदावर इच्छुक होती. परंतु, ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध होता. ममता बॅनर्जी यांचा नीतीश कुमार यांच्या नावाला विरोध असण्यामागे वरच्या जाती आणि ओबीसी जाती यांच्यामधला संघर्षही एक प्रकारे कारणीभूत होता. त्यामुळे नितीशकुमार यांना इंडिया आघाडीच्या नेतृत्वस्थानी आणण्यात, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी सारख्या वरच्या जातींच्या नेतृत्वाचा विरोध होता. जेव्हा इंडिया आघाडीच्या निमंत्रकपदी आपल्याला आता येताच येणार नाही, ही बाब स्पष्ट होताच नितिशकुमार यांनी इंडिया आघाडीशी संबंध तोडले आणि भारतीय जनता पक्षाशी जवळीक केली. यासाठी त्यांना नेमकी एक संधी मिळाली; बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि जननायक दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भारतरत्न जाहीर केला आणि या भारतरत्न पुरस्काराच्या आनंद सोहळ्यात सामील होत असतानाच नितिशकुमार यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाशी संधान साधले. राजकारण हे कायम स्थिर नसते, राजकारणात मित्र आणि शत्रू हे कुणीही कायम नसतात, अशी तात्विक विचारसरणी नेहमीच सांगितली जाते. परंतु, राजकारणाचा तात्विक पाया इतका ठिसूळ झाला किंवा इतका घसरला की, कोणत्याही सामाजिक विचारांपासून राजकीय नेत्याची सलग्नता राहत नाही. त्यामुळे भारतीय समाजात आणि राजकारणात नव्याने एक ओळख स्थापन करताना नीतीशकुमार यांच्या या स्थिर सामाजिक भूमिकेतून येणाऱ्या राजकारणाला एक नवा आयाम मिळेल. भारताच्या राजकीय इतिहासामध्ये त्यांच्या विरोधाची एक झालंर पेश करत राहील की,  राजकारणात राहूनही इतिहासाशी प्रामाणिक राहण्याची भूमिका वठवता येऊ शकते, परंतु नितीश कुमार यांनी या सर्वच भूमिकांना मझधारेत सोडून देऊन, ते मात्र काठावर येऊन बसले आहेत. ही विसंगती इतिहास विसरणार नाही. हा इतिहास त्यांना माफही करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका अगदी दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, भारतीय जनता पक्षाविरोधात देशातील इतर राजकीय पक्ष मिळून लोकसभेची निवडणूक आघाडी तयार होऊन,  लढण्याच्या प्रयत्नांना नितीश कुमार यांच्या भूमिकेने आणि त्याआधी ममता बॅनर्जी यांच्या लहरी भूमिकेने खिळ बसवला आहे. त्यातच आता देशात भारतीय जनता पक्षाला कोणी हरवू शकत नाही, या समीकरणाला यामुळे शक्ती मिळणार आहे.

COMMENTS