Homeताज्या बातम्यादेश

काश्मिरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

’ऑपरेशन काली’ अंतर्गत सुरक्ष दलाची कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यातील समनू गावात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात सुरक्षा दलाच्या जवानांना पाच द

भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा.
मुलीला त्रास देत असल्याचा जाब विचारल्यामुळे मारहाण
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे शनिवारी आगमन

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यातील समनू गावात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात सुरक्षा दलाच्या जवानांना पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. सर्व दहशतवादी लश्कर-ए-तोयबा आणि टीआरएफशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. मृत दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते.
गुरुवारपासून सुरू असलेली ही चकमक शुक्रवारी देखील सुरू होती. डीएच पोरा भागातील सामनो भागात ही चकमक सुरू असून या संयुक्त कारवाईत राष्ट्रीय रायफल्स, पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांचा समावेश होता. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घुसखोरीच्या प्रयत्ना दरम्यान हे दहशतवादी मारले गेले. याआधी बुधवारी सुरक्षा दलांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी ’ऑपरेशन काली’ सुरू केले असून या कारवाईत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बशीर अहमद मलिकसह दोन जण ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली. ठार मारण्यात आलेले हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत होते. काश्मीर पोलिसांनी या बाबत ट्विट केले आहे. ’कुलगाम पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफने 5 दहशतवाद्यांना ठार केले आहे. त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात आहे. सध्या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराचे छावणीत रुपांतर केले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, अंधार झाल्याने ही कारवाई रात्री काही काळ थांबवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सुरक्षा दलाकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

COMMENTS