Homeताज्या बातम्यादेश

मध्य प्रदेशात उसळला हिंसाचार

मतदानादरम्यान दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज

भोपाळ ः मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांसाठी आणि छत्तीसगडमध्ये 70 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असतांना, मुरैना जिल्ह्यातील दिमानी मदारसंघा

निवडणुकीतील राजकीय नाट्य
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल
मुख्यमंत्र्यांचा हा डायलॉग एकूण एकच हशा पिकला

भोपाळ ः मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांसाठी आणि छत्तीसगडमध्ये 70 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असतांना, मुरैना जिल्ह्यातील दिमानी मदारसंघात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. यात एकजण गंभीक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारामागचं कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. या हिंसाचारात एक जन जखमी झाल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेशातील दिमणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 148 वर शुक्रवारी सकाळी दोन गटात तूफान हाणामारी झाली. तोंडावर कापड बांधलेल्या काही लोकांनी दगडफेक सुरू केली. तर एकमेकांवर गोळीबार करण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. तसेच हिंसाचारानंतर या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची देखील माहिती आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोरांचा पाठलाग केला असून सध्या या ठिकाणी तणाव पूर्ण शांतता आहे. तसेच गैरप्रकार तळण्यासाठी या ठिकाणी बूथवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या दगडफेकीत एक मतदार जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली असून मतदान प्रक्रिया सुरक्षेत सुरू आहे. मतदान केंद्राबाहेर सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिमाणी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.

डीएसपी विजय सिंह भदौरिया यांनी सांगितले की, हा बुथ संवेदनशील आहे. या ठिकाणी अतिरिक्त सीमा सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन गटामद्धे वाद आणि दगडफेक झाल्यावर मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दंगलखोरांना पिटाळून लावले. यानंतर बंदोबस्त वाढवून येथील मतदान शांततेत सुरू करण्यात आले. डीएसपी भदौरिया म्हणाले की, काही गावकर्‍यांनी गोळीबार झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, या घटनेची पुष्टी झालेली नाही. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, काही मतदार संघात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना झाल्या. इंदूरमध्ये रात्री झालेल्या गोंधळानंतर मुरैनामध्येही हिंसाचार तसेच मोठ्या प्रमाणात दगदफेकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

COMMENTS