माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगांनी सुचविले मोदींना पाच उपाय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगांनी सुचविले मोदींना पाच उपाय

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डॉ. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.

मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक
कन्नड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
मृत्यूचे तांडव ; वीज अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू, दोन जखमी | LOK News 24

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डॉ. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी पाच उपाय सुचवले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोदी यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. सिंग यांनी म्हटले आहे, की लस निर्माता कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीला सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी आणि किती डोसची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे. जर आपण या सहा महिन्यांच्या काळात निश्‍चित करण्यात आलेल्या नागरिकांचे लसीकरण केले, तर आपल्याला आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरुन लसींचे डोस आपल्याकडे उपलब्ध असतील. त्यांनी सुचवले, की कोरोनाच्या या लसींच्या डोसचे वितरण हे पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. आपण किती नागरिकांचे लसीकरण केले आहे, हे पाहण्याऐवजी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचे लसीकरण केले याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची श्रेणी निश्‍चित करण्याची सूट द्यायला हवी. जेणेकरुन अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सलासुद्धा लस मिळेल. जे 45 वर्षांहून कमी वयाचे आहेत आणि ज्यांना राज्य सरकारने फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीत समावेश केले आहे, त्यांना लस देण्याचे नियोजन करता येईल. डॉ. सिंग यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे, की जगातील सर्वांत मोठा लस उत्पादक देश म्हणून भारत उदयास आला आहे. त्याचे मी कौतुक करतो. लस उत्पादक कंपन्यांना सरकारने आवश्यक निधी आणि इतर साह्य पुरवावे जेणेकरुन लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू राहील. अशा परिस्थितीत कायद्यातही आवश्यक परवान्यांची तरतूद आणली पाहिजे, जेणेकरुन अधिकाधिक कंपन्यांना परवाना मिळेल आणि लस निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. डॉ. सिंग यांनी शेवटचा उपाय सांगताना म्हटले आहे, की सध्या देशात लस पुरवठा मर्यादित होत आहे. अशा परिस्थितीत जर जगातील इतर विश्‍वसनीय लसीला मंजुरी मिळाली असेल, तर ती लस आपण आयात करायला हवी. आपण भारतात त्याची चाचणीशिवाय लसीकरण करु शकतो. या वेळी भारत आपत्कालीन परिस्थितीत आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग करताना देशात त्याची चाचणीसुद्धा करता येऊ शकते.

COMMENTS