Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशीष शेलार यांनी केला. स

फलटणमध्ये पुण्याच्या व्यापार्‍याला भरदिवसा लुटले
कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू : चैतन्य दळवी
अखेर हेळगाव चिंचणी रस्त्याच्या कामाला सुरुवात

मुंबई : शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशीष शेलार यांनी केला. सल्लागाराला नियमबाह्य पद्धतीने अधिक रक्कम देण्यात आली असून कॅगनेही त्यावर ताशेरे ओढले आहेत, असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
 मुंबई महानगर पालिका ठरवून बनावा बनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चालले काय? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचे मी सत्ताधार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी चालू आहे, असे त्यांनी सांगितले. प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या कन्सल्टंटला कुठे ना कुठे बेकायदेशीर मदत केली जात आहे. त्यांना जास्तीचा पैसा दिला जात आहे. वेगवेगळ्या पॅकेजमधील तीन कंत्राटदार आहेत. त्यांना अवास्तव बिले दिली जात आहेत. मी जेव्हा आरोप केले होते. तेव्हा पालिकेने असे काही नसल्याचे म्हटले होते. तसे लिखीत उत्तर पालिकेने दिले होते. माझ्याकडे पुरावे आहेत. 23 एप्रिल 2021चा सीएजी रिपोर्ट आहे. महापालिकेने 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 दरम्यान केलेल्या कोस्टल रोडच्या कामावर कॅगने या अहवालात ताशेरे ओढले आहेत. पालिकेकडून बेकायदेशीर बिले दिली जात आहेत. कंत्राटदारांना विशेष मदत केली जात आहे. मुंबईकरांच्य पैशाची लूट केली जात आहे. हा सर्व भ्रष्टाचार आहे. बनवाबनवी आहे. त्यावेळी मी 1600 कोटीचा तवंग समुद्राच्या पाण्यावर येत असल्याचे म्हटले होते. त्याचे एक पान कॅगने खोलले आहे, असे शेलार यांनी सांगितले.
कॅगने कोस्टल रोडवर काय ताशेरे ओढले त्यावरही शेलार यांनी भाष्य केले. कोस्टल रोडचा डीपीआर हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा असल्याचे कॅगने म्हटले आहे. डीपीआर करताना जे ट्रॅफिकचे अचूक विश्‍लेषण केले जाते. यात वाहतुकीचे अ‍ॅनालिसिस केले गेले नाही, असे कॅगने म्हटले आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS