पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद

तालुक्यातील जवखेड खालसा येथील सरगड वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी आठ वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला.

कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी 4.65 कोटीची मान्यता
Sangamner : थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
रत्नदीपच्या डॉ. भास्कर मोरेनी जामीन अर्ज घेतला माघारी

पाथर्डी/प्रतिनिधी : तालुक्यातील जवखेड खालसा येथील सरगड वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी आठ वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला.बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  तर सदरील बिबट्याला  तिसगाव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर,वनपाल वैभव गाढवे,वनरक्षक कविता दहिफळे,पिसे,विष्णु मरकड, वनमजुर कनिफ वांढेकर,चालक गणेश पाखरे यांच्या पथकाने आज सकाळी माळशेज घाट येथे बिबट्याला सोडले आहे.  

    याबाबत अधिक माहिती अशी की,शुक्रवारी जवखेडे खालसा येथील शेतकऱ्यांच्या शिळीची शिकार बिबट्याने केली होती.त्यानंतर जवखेडे खालसा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार वनविभागाने शनिवारी जवखेडे खालसा येथे पिंजरा लावला होता.बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

COMMENTS