Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी टेम्पो चालकास लुटले

बुरुडगाव रोड वरील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी ः टेम्पो चालकास समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघानी थांबवून त्यांच्या आणखी दोन साथीदारासह शिवीगाळ करुन कोयत्याचा धाक दाखवून लाथा ब

राहुरी कॉलेजमधील शेकडो झाडांना आस पाण्याची
महिलेवर अत्याचार.. माजी पोलिस निरीक्षकांच्या मुसक्या आवळल्या l पहा LokNews24
नव्या केंद्रीय सहकार मंत्रालयाचे नगरमधून स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी ः टेम्पो चालकास समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघानी थांबवून त्यांच्या आणखी दोन साथीदारासह शिवीगाळ करुन कोयत्याचा धाक दाखवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.त्यांच्या कडील 11 हजार रुपये बळजबरीने लुटून नेले.ही घटना बुरुडगाव रोड वरील नक्षत्र लॉन जवळील साईनगर कमानी जवळ घडली.
या बाबतची माहिती अशी की मच्छिंद्र गोविंद दींडे ( वय 40 वर्षे रा.भोसले लॉन शेजारी, बुरुडगाव रोड, अ.नगर) हे त्यांच्या अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम एच 16 ए वाय 0937) मध्ये लाईट घेऊन त्यांच्याकडे डेकोरेशनचे काम करणारा कामगार निखील नरवडे (रा. कोठी अ.नगर) व मित्र कुणाल फूलसौंदर (रा.सारसनगर अ.नगर) असे राहुरी येथे लाईट डेकोरशनचे काम असल्याने टेम्पो घेवुन गेले होते. लाईट डेकोरेशनचे काम आटोपून मिळालेले एकुण अकरा हजार रुपये घेऊन घरी जाण्यासाठी निघाले. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास बुरुडगाव रोडवरील साईनगर कमानी जवळून जात असताना समोरुन येणारे पांढर्‍या रंगाच्या एका मोपेड गाडीवरील 20 ते 25 वर्षे वयाचे दोन अनोळखी इसमांनी टेम्पोजवळ येवुन हात करुन थांबवण्याचा इशारा केला असता दिंडे यांनी टेम्पो थांबवला. त्यानंतर दिंडे व त्यांचे सोबत असणारे कामगार निखील नरवडे व कुणाल फुलसौंदर टेम्पोतून खाली उतरले असता ते दोन अनोळखी इसमानी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आणखी एका मोपेड गाडीवरुन दोन अनोळखी इसम आले व ते शिवीगाळ करु लागले .तेव्हा तुम्ही आम्हांला शिवीगाळ कशाला करता ? काय काम आहे ते बोला ? असे म्हटले असता त्या चार अनोळखी इसमांनी तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या अनोळखी इसमांपैकी एकाने कोयता दाखवुन दिंडे यांच्या शर्टच्या खिशातील अकरा हजार रुपये बळजबरीने काढून चोरुन नेले.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी मच्छिंद्र गोविंद दिंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी चार इसमाविरुध्द गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास महिला पोलिस उप निरीक्षक मोरे या तपास करीत आहे

COMMENTS