Homeताज्या बातम्याफीचर

शेती संस्कृतीला संजीवनी देणारे डॉ.एम.एस. स्वामीनाथन !  

अखंड भारत हा कृषिप्रधान देश आहेत. गरीब आणि हलाकीच्या परिस्थितीत शेतीपूरक महाकाय लोकसंख्येच्या राष्ट्राला सुधारण्याचे काम डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांन

जुन्या पेन्शनबाबत मध्यमार्ग काढू – मुख्यमंत्री शिंदे
सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे पनवेल ते वाशी रेल्वेसेवा ठप्प 
हेळगावचे उपसरपंच पद तीन जणांना विभागून दिले जाणार: ग्रामपंचायतीची पहिली सभा संपन्न

अखंड भारत हा कृषिप्रधान देश आहेत. गरीब आणि हलाकीच्या परिस्थितीत शेतीपूरक महाकाय लोकसंख्येच्या राष्ट्राला सुधारण्याचे काम डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांनी केले. अवघे आयुष्य तन- मन-धन सर्वच वाहून दिलेले स्वामीनाथन गणपती विसर्जनाच्या दिवशीच अनंतात विलीन झाले. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या दिवशी अशा सृजनशील व्यक्तिमत्वाची आठवण येणे साहजिक आहेत. हे आपल्या शेतकरी वर्गाला माहिती होणे गरजेचे असल्याने हा छोटासा आठवणमय प्रपंच आपणा समोर ठेवत आहेत. माणूस म्हणून हे सृजनशील व्यक्तिमत्त्व किती मोठे होते. हे काही सांगायला नकोत, त्यांचे उदात्त कार्य म्हणजे त्यांना “हरित क्रांती” चे जनक म्हणत. 

शेती संशोधन , मधमाशा पालन , शेतकर्याची वास्तविक आर्थिक स्थिती अशा अनेक क्षेत्रात त्यांनी डोंगरा एवढे काम उभे केले.

एम.एस.यांना तीन वेळा पद्मपुरस्कार मिळालेले आहेत.पण त्या व्यतिरिक्त रॅमन मॅगसेसे , आइन्स्टाईनसह ३५ हुन अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मानाचे ते धनी होते. भारतीय विद्यापीठाच्या ३३ विद्यावाचस्पती , आंतराष्ट्रीय संस्थाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 

महात्मा गांधी व स्वामी विवेकानंद यांचे विचारांनी ते प्रेरित झाले व तसे अनुकरणही केले. बंगालमधील दुष्काळाच्या झळा त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाला कारणीभूत ठरल्या. म्हणूनच ते अर्धवट वैद्यकीय शिक्षण सोडून शेतकी क्षेत्राकडे वळले.शेतीची जाणीव त्यांना विध्यार्थी दशेत झाल्याने त्यांनी पुढील जवळपास साठ वर्ष आपले आयुष्य शेती संशोधनात वाहून दिले.

माझ्या वाचनात आले होते की साधारण ६० च्या दशकात भारतातील अन्नधान्य हे पुढील दहा वर्ष पुरेल इतकेच आहेत मात्र स्वामी नाथन यांनी हे शास्त्रीय माहिती आधारे शेती पूरक संशोधन करून त्यांचे शब्द त्यांच्या च घशात घातले. आज भारत देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण तर झालाच शिवाय असंख्य देशाना शेती मालाची निर्यात देखील करतो आहेत. वनस्पतींची पैदास व नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन या विषयावरही त्यांनी विशेष काम केले आहेत. गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गहू व तांदळाच्या कमाल उत्पन्न देणाऱ्या वाणांची लागवड करून त्यांनी आपल्या संशोधन कार्यात शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले. काळानुरूप होत जाणाऱ्या बदलांचा वेध घेत आपल्याच संशोधनात बदल करीत राहणे , खंडव्यापी देशातील बहुविध वातावरणात टिकाव धरू शकेल , अशा पिकांच्या जाती , वाण तयार करणे अशी मोजता येणार नाहीत एवढी कामं करून ठेवली आहेत. सन १९९९ मध्ये जगप्रसिद्ध “टाईम” साप्ताहिकाने आशियावर प्रभाव पाडणाऱ्या तीन व्यक्तिमत्वांची नावे घेतली त्यात स्वामीनाथन यासोबतच महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर होत.

साधारण  २० वर्ष पूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने स्वामीनाथन यांच्या नेतृत्वांखाली कृषी सुधारणांसाठी आयोग नियुक्त केला.शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी , शेती उत्पादन वाढावे या उद्देशाने हा आयोग स्थापन करण्यात आला. “शेतमालाचे भाव हे उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक असावे व नफ्यातील ५० % वाटा त्यांना मिळावा तसेच सरकारी नोकऱयांप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळावी” , या  शिफारशी अहवालातच बंद राहिल्या. बऱ्याच सुधारणा त्यांनी सुचविल्या मात्र सरकारने  अशी कृतीच केली नाही की स्वामीनाथन लागू होईल. 

“शेती संस्कृतीचा” खरा योद्धा आपल्यातून निघून जावा , ही देशाची मोठी हाणीच आहेत. मोजकीच अशी व्यक्तिमत्वे घडत असतात. खरोखर शेतीला जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने एम.एस. स्वामीनाथन यांना खरी आदरांजली ठरेल. 

असो , धन्यवाद ! 

योगेश रोकडे नाशिक  ९४२२८९२१९८

COMMENTS