शिर्डी ः मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व आरक्षणाचे मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सोमवार रोजी शिर्

शिर्डी ः मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व आरक्षणाचे मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सोमवार रोजी शिर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती यास स्थानिक हॉटेल व्यवसायिक व्यापारी उद्योजक छोटे-मोठे दुकानदार व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभर टक्के बंद यशस्वी केला तर शिर्डी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे आता आमरण उपोषणा मध्ये रूपांतर केले असून स्थानिक सात समाज बांधवांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान गाढवांच्या तोंडाला ड गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेचा मुखवटा बनवून त्यांची धिंड काढण्यात आली यावेळी गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात घोषणाबाजी करत शासनाचाही निषेध नोंदवण्यात आला. जगाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणा-या श्री साईबाबांच्या शिर्डीतील नगरपरीषद शेजारील पटांगणात मराठा आरक्षणासाठी गेली चार दिवसांपासून राहाता तालुका मराठा समाजा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
सरकारला जाग यावी यासाठी सोमवारी संपूर्ण दिवस शिर्डी शहर बंद ठेवण्यात आले.येथील छोट्या मोठ्यासह सर्वच व्यावसायिकांनी मराठा आरक्षणाचे मागणीला पाठींबा देत बंदमध्ये सहभागी होत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. साई दर्शनासाठी येणार्या भाविकांना कुठल्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही तसेच त्यांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी समाज बांधवांनी घेतली त्यामुळे दर्शनाच्या बाबतीत भाविकांना त्रास झाला नाही. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने भाविकांनी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भोजनप्रसादाचा लाभ घेतला.तसेच काल साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी अर्थात सोमवार दि.30 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण थांबवून सचिन नानासाहेब चौगुले, रविंद्र पांडुरंग गोंदकर, अनिल रामचंद्र बोठे, नितीन अशोक कोते, प्रकाश मछींद्र गोंदकर, प्रशांत प्रकाश राहाणे, कानिफ सोपान गुंजाळ आदी सात मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. काल सकाळपासून शिर्डी शहरातील धनगर समाज, मुस्लिम समाज,परीट समाजाच्या बांधवांसह निळवंडे धरण कृती समितीचे नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा दिला.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राणे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.तसेच ड गुणरत्न सदावर्ते सातत्याने मराठा समाजाबद्दल गरळ ओकत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करत आहे याचा निषेध करून सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली. यावेळी आमरण उपोषणास बसलेले शिर्डीतील भुमीपुत्र रविंद्र गोंदकर यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले की, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 40 दिवसांची मुदत मागितली होती.त्यानंतर आता आणखी सहा दिवस उलटून गेले आहे.म्हणजे 46 दिवसानंतर या सरकारला आरक्षण देता आले नाही तर पुढे काय यांचा भरवसा आहे असा सवाल उपस्थित करत राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले सरकारला माझी विनंती आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही.मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे.मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना काही कमीजास्त झाल्यास समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणी संपूर्ण राज्य ठप्प केल्याशिवाय राहणार नाही.याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.मराठे षंढ नाही त्यामुळे गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण सरकारने द्यावे असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी कमलाकर कोते, विजय जगताप, रमेश गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, सुजित गोंदकर, विजय काळे, प्रमोद गोंदकर, ताराचंद कोते, विकास गोंदकर, गणेश कोते, वैभव कोते, अभिजित कोते, संभाजी नगर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक अॅड सुवर्णा मोहीते, विरेश चौधरी, अॅड अनिल शेजवळ, सुनील परदेशी,अरुण गायकवाड, पुंडलिक बावके, गफ्फारखान पठाण, आदीसह शेकडोंच्या संख्येने शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS