Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध गायक अरमान मलिक लवकरच अडकणार विवाह बंधनात

लोकप्रिय गायक अरमान मलिकने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गुड न्यूज दिली आहे. त्याने लॉंग टर्म गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा उरकला. आ

भाजप का करतेय विखे पिता पुत्रांच्या आर्थिक घोटाळ्याकडे दुर्लक्ष ?
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या शनिवारी
नामांकित हमदर्द कंपनीकडून औषधींची बेदर्द भाव वाढपन्नास टक्क्यांनी वाढलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार

लोकप्रिय गायक अरमान मलिकने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गुड न्यूज दिली आहे. त्याने लॉंग टर्म गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा उरकला. आशनासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडिया हँडलवर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय अरमान आणि आशना 2019 पासून एकमेकांना डेट करत असून ते आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनीही 28 ऑगस्टला हे फोटो शेअर केले. अरमान मलिकने कॅप्शनमध्ये म्हटले की, “आमच्या कायम एकत्र राहण्याच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे. या फोटोंमध्ये अरमान आशनाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. दोघांचे रोमॅंटिक फोटो पाहून बॉलीवूडमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. आशना श्रॉफ ही सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह असून ती एक लोकप्रिय युट्यूबर आणि ब्लॉगर आहे. फॅशन आणि ब्यूटीसंबंधित व्हिडीओ ती बनवत असते. आशना ही अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी असल्याची माहिती आहे. आशनाचा जन्म 4 ऑगस्ट 1993 रोजी झाला, तर अरमानचा जन्म 22 जुलै 1995 ला झाला आहे. अरमान मलिक हा प्रसिद्ध संगीतकार सरदार मलिक याचा नातू आणि गायक अनु मलिक यांचा पुतण्या आहे.’जहर’,’बोल दो न जरा’,’पहला प्यार’,’मुझको बरसात बना लो’,’मैं रहूँ या न रहूँ’ अशी अनेक सुपरहिट गाणी अरमान मलिकने गायली आहेत.

COMMENTS