Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

रस्त्यांच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिका

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; अमरावतीत ठिक ठिकाणी आंदोलन
सरकार, काॅलेजियम आणि संघर्ष !
केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे- आ. रोहित पवार

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचे हाल कमी करण्यासाठी ठाणे पोलिस आणि जिल्हा प्रशानसाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी दिवसा अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात पुढील काही दिवस अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना पुढील एक ते दोन दिवसांत काढली जाणार असल्याची माहिती आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय रस्त्यांच्या दुरुस्तीकाळात अवजड वाहनांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळं आता आठवड्याच्या सुरुवातीलाच रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील नादुरुस्त रस्त्यांचा प्रश्‍न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला होता. त्यामुळे पालिकेकडून आता रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

COMMENTS