Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश राज यांना चांद्रयान ३ची खिल्ली उडवणं पडलं महागात

मुंबई प्रतिनिधी - अभिनेता प्रकाश राज आपल्या एका पोस्टमुळे टीकेचे धनी ठरले आहेत. प्रकाश राज यांनी चांद्रयान 3 संबंधी एक पोस्ट केली असून, त्या

आयपीएस देवेन भारतीविरोधात गुन्हा दाखल | LOKNews24
परमबीर सिंग यांच्या अटकेस मनाई
बुद्धीवादी माणस व्यक्तच होत नाहीत ही आजच्या भारताची प्रमुख समस्या-डॉ.राजेश इंगोले

मुंबई प्रतिनिधी – अभिनेता प्रकाश राज आपल्या एका पोस्टमुळे टीकेचे धनी ठरले आहेत. प्रकाश राज यांनी चांद्रयान 3 संबंधी एक पोस्ट केली असून, त्यातील कार्टून पाहून अनेकजण संतापले आहेत. यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे.  प्रकाश राज हे कट्टर भाजपाविरोधी असून, अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. पण यावेळी त्यांनी चांद्रयान 3 ला मधे आणल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली. दरम्यान, ही टीका होत असतानाच प्रकाश राज यांनी नव्यान ट्विट करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. प्रकाश राज यांची नेमकी पोस्ट काय?संपूर्ण भारत सध्या 23 ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहे. याचं कारण म्हणजे याच दिवशी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. ISRO च्या या मोहिमेकडे फक्त भारतीय नाही, तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. त्यातच रशियाचं Luna 2 अपयशी झाल्याने, भारताच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पण यादरम्यान अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान 3 ची खिल्ली उडवल्याने नेटकरी नाराज झाले.  प्रकाश राज यांनी या पोस्टमध्ये इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं कार्टून शेअर केलं होतं. या फोटोत के सिवन शर्ट आणि लुंगी घातलेले असून हातात चहा दिसत आहे. थोडक्यात, प्रकाश राज यांनी त्यांना चहावाला दाखवलं आहे.  हे कार्टून शेअर करताना प्रकाश राज यांनी चंद्रावरुन आलेले पहिले फोटो असा टोला लगावला. ‘विक्रम लँडरने चंद्रावरुन पाठवलेला पहिला फोटो,’ असं प्रकाश राज यांनी लिहिलं होतं.  प्रकाश राज विरोधात तक्रार: अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. किंबहुना, ‘चांद्रयान-3’ मिशनवर केलेल्या ट्विटमुळे प्रकाश राज यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS