पाथर्डी तालुक्यात पावसाचा हाहाःकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यात पावसाचा हाहाःकार

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी तालुक्यात व शहरात सोमवारी सायंकाळपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे नदी नाले एक झाले असून अनेक गावांत पूर परिस्थिती 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौर्‍यावर
राज्यात लम्पीने 32 जनावरांचा मृत्यू : मंत्री विखे
आनंदऋषीजी महाराज प्रतिमेची पालखी मिरवणूक

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी तालुक्यात व शहरात सोमवारी सायंकाळपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे नदी नाले एक झाले असून अनेक गावांत पूर परिस्थिती  निर्माण झाली होती.काहींच्या घरात पाणी शिरले होते तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होता.परंतु सोमवारी मध्यरात्री पासून पावसाने जोर धरल्याने दोन महिन्यांच्या पावसाची उणीव एकाच दिवसात पावसाने भरून काढल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारीमुळे व रखडलेल्या कामामुळे शहरातील भानुप्रयाग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यातील दुकानात पाणी शिरले तसेच खेडकर हॉस्पिटलमधील पांडुरंग लाड यांच्या पॅथॉलाजी लॅब मध्ये पाणी गेल्याने एक्सरे मशीन व इतर साधनसामग्री मशिनरी खराब झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शहरातील वनदेव भागातील गावातळे पाण्याने ओसुडून वाहत होते. अनेक नद्यांना पूर आले तर काही गावांमध्ये पाणी शिरले होते. पूरामुळे अनेक ठिकाणी जनावरे वाहुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत.तालुक्यातील कोरडगाव,अकोला,पागोरी पिंपळगाव,वाळुंज,तिसगाव,घाटशीरस,माणिकदौडी येथील नद्यां तुडुंब भरल्या आहेत.तसेच कुत्त्तरवाडी येथील तलाव  तलाव देखील भरला आहे..

COMMENTS