Homeताज्या बातम्या

औरंगाबादमध्ये अभियंता अडकला हनीट्रपमध्ये

प्रेमाच्या जाळ्यात ओढून ठेवले शरीरसंबंध

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एका अभियंत्याला हनीट्रपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रकार घडला आहे. तरुण अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्या

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सजग राहण्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे आवाहन
स्वच्छता सभापती शेख निजाम यांना स्वच्छतेसंदर्भात निवेदन देताना महिला शहराध्यक्ष रेहाना पठाण, नगरसेवक खुर्शीद आलम व शेख रईस उपस्थित होते
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले ! | LOK News 24

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एका अभियंत्याला हनीट्रपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रकार घडला आहे. तरुण अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची मागणी केली. या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे यातील एका आरोपीने मुंबई क्राईम ब्रँचमध्ये अधिकारी असल्याचं सांगत धमकावल्याचाही स्पष्ट झालं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित 27 वर्षीय तरुणाला आरोपी तरुणीने आपल्या मादक अदा दाखवत जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणासोबत शरीर संबंध बनविले. पुढे आरोपी प्रतिक जाधव व संजय जाधव यांनी कार्यालयीन कुरिअर आल्याच्या बहाण्याने तरुणाला संपर्क केला व पांढर्‍या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसवून एका हॉटेल मध्ये घेऊन गेले. तिथे आपण मुंबई क्राईम ब्रँचचा पोलीस निरीक्षक प्रदीप घुगे असल्याची बतावणी केली. तुमच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, अशी खोटी भीती दाखवली. तरुणाचे नको त्या अवस्थेत व्हिडीओ तोतया पोलिसांच्या भीतीने तरुण घाबरला. एवढ्यावरच न थांबता दोघांनी तरुणाला निर्वस्त्र करत व्हिडिओ बनविला. प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. या दरम्यान तरुणाजवळील चाळीस हजार रुपये व बुलेट दोघांनी नेली. बुलेट पाहिजे असल्यास पाच लाख रुपये घेऊन ये, असेही धमकावले. सातत्याने होत असलेल्या ब्लॅकमेलला वैतागून तरुणाने सातारा पोलिस ठाणे गाठत घडलेली हकिगत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सापळा रचून टोळीतील सर्व सदस्यांना अटक केली आहे. आणखी कोणी पीडित तर नाही ना? पोलिसांकडून तपास सुरू ही घटना समोर आल्यानंतर औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमागे संपूर्ण टोळी काम करत असल्याने आणखी कोणी पीडित आहे का? या अनुशंगाने पोलीस तपास करत आहेत. सोबतच अशा प्रकरणात कोणी अडकले असेल तर पुढे यायला हवे असे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.

COMMENTS