Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब

मुंबई : राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या वर

भोंगा वाजला की टीव्ही-मोबाईलसह इंटरनेट होणार बंद : वहागाव ग्रामपंचयातीचा निर्णय
राजारामबापू कारखान्याच्या कर्मचार्‍यांना 12 टक्के पगारवाढ : पी आर पाटील
वारूंजीत घुसीच्या पिंजर्‍यात उदमांजर

मुंबई : राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा टिकून आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीचा जोर वाढलेला दिसून येत आहे.

ढगाळ वातावरण असल्याने गारवा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला थंडी वाढण्याची शक्यता आहे. धुळे येथील कृषि महाविद्यालयात 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा 12 ते 22 अंशांच्या दरम्यान आहे. दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने 30 अंशांच्या वरच आहे. पाकिस्तानातून उत्तर भारतात येणार्‍या पश्‍चिमी चक्रवातामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हिमाचल या भागात कडाक्याची थंडी पडत आहे. तिकडून येणार्‍या शीत वार्‍यामुळे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घसरण झाली आहे. शनिवारी किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घसरण झाली. निफाड येथे 7.8 अंश, धुळे येथे 8.4 अंश सेल्सिअस नीचांकी नोंद झाली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील आणि कोकणातील काही भागात 24 ते 31 डिसेंबरपर्यंत गारठा जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर, एक जानेवारीपासून राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. तसेच, यंदा कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्येही थंडी अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

COMMENTS