Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणुकीतील राजकीय नाट्य

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्ष फोडा-फोडीचे राजकारण एका वेगळ्याच टोकावर पोहचले होते. अशा परिस्थितीत

नितीशकुमार संधीसाधू राजकारणी
रथयात्रा, पदयात्रांचे पेव
आश्‍वासने आणि पक्षाचा अजेंडा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्ष फोडा-फोडीचे राजकारण एका वेगळ्याच टोकावर पोहचले होते. अशा परिस्थितीत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असल्या तरी, सर्वांचे लक्ष महाराष्टावर केंद्रीत झाले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेनेत पडलेली उभी फूट. त्यानंतर दोन्हीकडच्या गटांनी सवतासुभा निर्माण करत एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे. बारामतीमध्ये सध्या चांगलाच हायहोल्टेज सामना रंगण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडी बाहेर पडत त्यांनी आपले 19 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे त्याचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या 7 जागांवर त्यांना मदत करणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार वंचितने कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे काँगे्रस देखील वंचितला अकोल्यात मदत करण्याची शक्यत आहे. काँगे्रसने जरी अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी, काँगे्रस हायकमांडकडे मागणी करून काँगे्रस अकोल्यात वंचितला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. असे झालेच तर वंचितचा आणि काँगे्रसचा आतून समझौता झाल्याचे दिसून येईल. यासोबतच अहमदनगर दक्षिण मधून शरद पवारांच्या पक्षाने नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे सुजय विखे विरूद्ध नीलेश लंके असा सामना रंगणार आहे. कारण दोन्ही नेते तुल्यबळ असल्यामुळे या मतदारसंघात चांगलाच कस लागण्याची शक्यता आहे. शिवाय ओबीसी राजकीय आघाडी देखील या मतदारसंघात निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे ओबीसी फॅक्टर या मतदारसंघात कळीचा मुद्दा ठरू शकतो.

दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा उमेदवार उभा करण्याचा किंवा कोणत्या नेत्याला पाठिंबा देण्याचा कोणताही प्रस्ताव मंजूर केलेला नाही, अन्यथा या मतदारसंघात तो फॅक्टर देखील महत्वाचा ठरला असता. दुसरीकडे बारामती मतदारसंघात यंदा नणंदविरूद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. कारण महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. अर्थात नणंद भावजय असा सामना असला तरी, हा सामना हायहोल्टेज सामना होणार आहे, त्यामुळे कुणाच्या मागे पुण्याई कामा येते की, विकासकामे कामी येतात, याचा उलगडा होण्यासाठी काही दिवसांचा अवधी उरला आहे. असे असले तरी, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात हायहोल्टेज सामने रंगण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे काँटे की टक्कर या मतदारसंघात बघायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांच्यामागे त्यांचे वडील शरद पवारांचा राजकीय, वैचारिक वारसा आहे. तर दुसरीकडे आपल्या फटकळ वागण्याने आणि विकासकामे करण्यात पटाईत असणारे अजित पवारांच्या पत्नी समोर आहेत. अशावेळी अजित पवारांना महायुतीतील घटक पक्षांची कितपत साथ मिळते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण पवार कुटुंबीय सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतांना दिसून येत आहे. याउलट अजित पवारांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार आणि सख्खा पुतण्या युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंचा प्रचार करतांना दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवारांची भिस्त आता महायुतीतील घटक पक्षांवर असल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या असल्या तरी, दादांच्या दादागिरीचा वचपा काढण्याची संधी सोडणार नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय या निकालावरून दादांचे राजधानीतील भवितव्य ठरणार आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत गणिते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले पारडे जड कसे ठरेल, यासाठी शिंदे गट, अजित पवार गट आणि पक्ष आणि चिन्ह हातातून गेलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हान देणारी असेल यात शंका नाही. 

COMMENTS