Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण काढताना राडा

चप्पल स्टँड हटवतांना भाविक आक्रमक झाल्याने गोंधळ

कोल्हापूर/प्रतिनिधी : सगळीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असतांनाच, श्री क्षेत्र अंबाबाईच्या कोल्हापूर येथील मंदिर परिसरात चप्पल स्टँड हटवण्यावरु

लातूरमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचा विक्रम; 60 कोटी 49 लाखांची वसुली
तरूण उद्योजकाची पत्नी अणि मुलासह आत्महत्या
आषाढी वारीसाठी वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत

कोल्हापूर/प्रतिनिधी : सगळीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असतांनाच, श्री क्षेत्र अंबाबाईच्या कोल्हापूर येथील मंदिर परिसरात चप्पल स्टँड हटवण्यावरुन चांगलाच वाद झाला आहे. पोलिस आणि चप्पल स्टँड चालकांमध्ये यामुळे झटापट झाली आहे. हे चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचे सांगत प्रशासनाकडून या चप्पल स्टँड चालकांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर पोलिस ते स्टँड हटवण्याची कारवाई करत होते. देवस्थानाने दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी मोफत चप्पल स्टँड सुविधा केली आहे. यामुळे मंदिराच्या शेजारी असलेल्या चप्पल स्टँड काढण्यात आले. येथील व्यावसायिक महिलांनी आक्रोश करत आम्ही जायचे कुठे असा सवाल प्रशासनाला करत दुकाने काढण्यास  विरोध केला. मात्र, येथील सर्व दुकाने अतिक्रमण विभागाने काढून टाकली आहेत.
यावेळी व्यावसायिक महिला धाय मोकलून रडल्या. येत्या काही दिवसांत नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. या साठी अंबाबाई देवस्थान सज्ज झाले आहे. येथील तयारी अंतिम टप्यात आली आहे. दरम्यान, येथे येणार्‍या भाविकांची संख्या बघता देवस्थान समितीने भाविकांसाठी चप्पल स्टँडची सोय केली आहे. जवळील शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेऊन येथून दर्शन रांग वाढवण्यात आली आहे. देवीचे दागिने देखील स्वच्छ करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिर परिसरात अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. येथे खासगी व्यवसईकांनी लावलेले चप्पल स्टँड हटवण्यासाठी तसेच अतिक्रम काढण्यासाठी आज ही कारवाई करण्यात आली. या कारवाईला व्यावसाईकांनी विरोध केला. यात महिला पुढे होत्या. अंबाबाई मंदिराच्या तोंडावर जी मूळ भिंत आहे, ती भिंत भाविकांना दिसायला हवी, अशी मागणी होती. मात्र या भिंतीला लागूनच खासगी व्यावसायिकांचे चप्पलांचे स्टँड आहेत. यामुळे येथील भिंत दिसत नव्हती. देवस्थान समितीने यामुळे नवे अधिकृत चप्पल स्टँड बांधले आहे.

COMMENTS