Homeताज्या बातम्यासंपादकीय

दहशतवाद्यांचे स्लीपर सेल

देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे टाकत, इसिससंबंधितांना ताब्यात घेतले आहे. यावरून अनेक बाबींचा बोध होतो. त्यामध्ये प्रमुख म्हणजे

फुटीरवादी संघटनांवर चाप
अपघात आणि सुरक्षेची चिंता
अर्थसंकल्प आणि शेतकरी

देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे टाकत, इसिससंबंधितांना ताब्यात घेतले आहे. यावरून अनेक बाबींचा बोध होतो. त्यामध्ये प्रमुख म्हणजे दहशतवाद्यांचे स्लीपर सेल अजूनही सक्रिय असून, विविध शहरांमध्ये ते वावरतांना दिसून येत आहे. त्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत ते कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना परदेशातून मिळणारा पैसा, मिळणार्‍या सूचना या सर्व बाबींवर एनआयएची बारीक नजर असल्यामुळे नुकतेच एनआयएने देशभरात 44 ठिकाणी छापे टाकत तब्बल 15 जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात 41 ठिकाणी तर पुण्यात दोन ठिकाणी आणि कर्नाटकात छापेमारी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे आयएसआयएस प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आले होते ज्यामध्ये आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते आणि आता या प्रकरणाशी संबंधीत ही कारवाई करण्यात आली आहे. खरंतर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएस गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद्यांचे जाळे उद्धवस्त करतांना दिसून येत आहे. कारण दहशतवाद्यांचे स्लीपर सेल जागो-जागी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. दररोजच्या जीवनात ते आपल्या सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगतांना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर साहजिकच कुणाला संशय येत नाही. मात्र दहशतवादी कृत्य करण्यासाठी त्यांना सूचना मिळत असतात, त्याप्रमाणे दहशतवाद्यांना आश्रय देणे, पैसा पुरवणे, साहित्य पुरवण्याचे कामे, सुरक्षित वाहतुकीसाठी गाड्या देणे हा स्लीपर सेल करतांना दिसून येत आहे. त्यामुळे या स्लीपर सेलचे पाळेमुळे खोदून काढण्यासाठी अनेक संघटनांवर बंदी घालण्यात येत आहे. पीआयबी संघटना देखील याचाच एक भाग होता. त्यानंतर तपास यंत्रणांचे सुरू असलेले छापे यातून अनेक बाबी अधोरेखित होतात. स्लीपर सेलच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये देखील या स्लीपर सेलने आपले चांगलेच बस्तान बसवल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी डॉ.अदनान अली सरकार याला अटक केली आहे. डॉक्टर अदनान अली सरकार भारतात युद्धासारखी परिस्थिती निर्माण करत होता. दहशतवाद्यांचा इशार्‍यावर गजवा-ए-हिंदसारखा कट भारतात तयार करण्याचा प्रयत्न डॉ.सरकार करत होता. पुणे शहरात अटक झालेला हा चौथा व्यक्ती होता. ज्याचा संबंध दहशतवादी कारवायांशी आला. यामुळे दहशतवाद्यांची पाळेमुळे पुणे शहरात खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पोलिसांसह तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पुण्यासोबतच ठाणे, भिंवडी, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, यासारख्या जिल्ह्यात स्लीपर सेल सक्रिय असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून येत आहे. एकतर दहशतवाद मोडीत काढायचा असेल तर, अगोदर स्लीपर सेल म्हणून काम करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याची खरी गरज आहे. यासोबतच गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. भारतातील सशस्त्र दले, नौसेना, तटरक्षक दल, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस ह्यांनी नाविण्यपूर्ण तंत्र अवंलबण्याची गरज आहे. स्लीपर सेलच्या मदतीने दहशतवादी हल्ले करण्याच्या योजना आखत असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानके, बस स्थानके येथे संशयित व्यक्ती आणि सामान ह्यांची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. सरकारी तसेच खासगी वाहनांची अगदी रुग्णवाहिकेचीही तपासणी करणे जरुरीचे आहे. ड्रोन विरुद्ध तंत्रज्ञान लवकरात लवकर प्रभावी करणे आणि भारत – पाकिस्तान सीमेवर ड्रोनच्या वापरास पूर्णपणे बंदी घालणे आवश्यक आहे. देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षा दले, पोलिस ह्यांनी केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळणार्‍या गुप्त माहितीवर अवलंबून न राहता, जमिनीवर प्रत्यक्ष काय चालू आहे हे कळण्यासाठी मानवी गुप्तहेरांचीही मदत घेणे गरजेचे आहे.

COMMENTS