Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी

राष्ट्रवादी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी

मुंबई ः कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते रोहित पवार यांना नुकतीच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवली असू

आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)
खर्डा दसरा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी
आ. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

मुंबई ः कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते रोहित पवार यांना नुकतीच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवली असून, त्यांना आज सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या दरम्यान रोहित पवार यांनी चांगल्याच शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. विशेष म्हणजे यात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्या चौकशीसाठी ते जेव्हा ईडी कार्यालयात जातील, तेव्हा त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसून राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचे कार्यालय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आपण भावूक झालो असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

प्रसंगी बाप माणूस ढाल बनून उभेही राहतात – राष्ट्रवादी काँगे्रस नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट देखील केली आहे. या संदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. वय झाले म्हणून काय झाले? प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात, हे माझ्यासाठी भारावणारे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.’ईडी कार्यालयात बुधवारी चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसे सहकार्य केले तसेच आताही अधिकार्‍यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचे सूडाचे राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये. उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणार्‍या व संविधानावर विश्‍वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे रहावे. कारण आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचा आणि महाराष्ट्र धर्म जपायचा असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

COMMENTS