आ. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

जामखेड प्रतिनिधी : नागरिकांना आरोग्य चांगले ठेवण्याची सवय लागावी या उद्देशाने आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा ने

आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)
केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे- आ. रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी :

नागरिकांना आरोग्य चांगले ठेवण्याची सवय लागावी या उद्देशाने आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमर चाऊस यांच्या पुढाकाराने नान्नज येथे आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राज्यभरातुन प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेत पहिले बक्षीस संदीप कुमार राठोड (अहमदनगर) यांनी जिंकले तर दूसरे 

किशोर विठ्ठल मरकड (पाथर्डी), तिसरे विक्रम लोखंडे (जामखेड), चौथे अखिल अविनाश जाधव(उस्मानाबाद), पाचवे बडे दामोदर (नारायण) यांनी जिंकले. 

यावेळी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा.मधुकर राळेभात, सभापती सूर्यकांत मोरे, शरद शिंदे, माजी उपसभापती दीपक पवार, सरपंच महिंद्र मोहळकर, लक्ष्मण ढेपे, दिलीप काकडे, नरेंद्र जाधव, त्रिंबक कुमटकर, अशोक पठाडे, गणेश चव्हाण, लियाकत शेख, सागर पवार, आप्पा मोहोळकर ,गणीभाई पठाण, बाळू गोरे, किरण पवार, नदीम पठाण, संतोष मोहळकर, अखिल शेख, पांडुरंग चव्हाण, योगेश रजपुत, सादीक चाऊस, आदम शेख, कयूम शेख, मधुकर वारद, भुजंग दळवी, अशोक गाजरे, निलेश साठे, गणेश पवार. राम गाजरे, अरबाज शेख, पांडू मोहळकर आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते अमर चाऊस प्रविण वाघमोडे आशोक पठाडे यांनी विशेष प्रयत्न केले.

COMMENTS