Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रस गळती रोखणार कशी ?

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जन्म झालेल्या काँगे्रसला आज घरघर लागल्याचे दिसून येत आहे. काँगे्रस एखाद्या वृद्धासारखी जर्जर झाली आहे. त्यामुळे

कर संकलनात वाढ, मात्र जनतेचे काय ?
काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?
सरकारची दुहेरी कोंडी

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जन्म झालेल्या काँगे्रसला आज घरघर लागल्याचे दिसून येत आहे. काँगे्रस एखाद्या वृद्धासारखी जर्जर झाली आहे. त्यामुळे काँगे्रसला अनेक जण सोडून तरूण असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. काँगे्रस संकटांत असतांना, काँगेसने आपल्या नेत्यांसोबत सुसंवाद ठेवण्याची गरज होती. मात्र हा सुसंवाद कमी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नेते काँगे्रसला सोडून जातांना दिसून येत आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसला गळती लागली असून अनेक नेत्यांची भाजप किंवा मित्रपक्षांत सामील होण्यासाठी रीघ लागली आहे. वडिलांपासून काँग्रेसचे विचार रुजलेले नेतेही भाजप व भाजपच्या सहकारी पक्षात प्रवेश करीत आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक मतदारसंघ जिंकण्यासाठी अन्य पक्षातील कोणत्या नेत्यांचा उपयोग होईल, यादृष्टीने नियोजन केले आहे. संबंधित नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करायचा की सहकारी पक्षात, याबाबतचे धोरणही बहुतांश प्रकरणांमध्ये भाजपच ठरवीत आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बाबा सिद्धीकी हे गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मात्र त्यांनीही नुकताच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या कुटुंबाला मुख्यमंत्रीपद एकदा नव्हे तर अनेकदा दिले. वडिलानंतर मुलाला देखील मुख्यमंत्रीपद दिलेले चव्हाण कुटुंबीय आता भाजपवासी झाले आहेत. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने काँगे्रसने आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. काँगे्रसने विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र लोकसभा निवडणुकींना सामौरे जाण्याआधीच काँगे्रसमधील अनेक मित्रपक्षांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. मायावती यांनी आधीपासूनच इंडिया आघाडीच्या बैठकांना येण्याचे टाळले. तर दुसरीकडे ममता बॅनजी यांनी पुढाकार घेऊन अनेकांच्या भेटी घेतल्या, त्यानंतर मात्र त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँगे्रस पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे केजरीवाल देखील स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. फारूक अब्दुल्ला यांनी देखील इंडिया आघाडीची साथ सोडली आहे. त्यामुळे इंडिया आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कितपत करिश्मा दाखवेल याबाबत साशंकता असल्याचे दिसून येत आहे.
काँगे्रसने गांधी घराण्याव्यतिरिक्त खरगेंना अध्यक्ष केले खरे, मात्र त्यांचे वय आडवे येतांना दिसून येत आहे. खरंतर काँगे्रस ही एखाद्या तरूण नेतृत्वाच्या हाती सोपवण्याची गरज होती. मात्र काँगे्रसचे गांधी कुटुंबीय अजूनही पक्षातील इतर नेत्यांवर विश्‍वास दाखवण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरगे यांना अध्यक्ष केले. मात्र त्यामानाने काँगे्रसने अजनूही आपल्या धोरणात्मक पातळीवर कोणतेही बदल केल्याचे दिसून येत नाही.  परिणामी काँगे्रसचे फायर ब्रिगेड नेते पक्ष सोडून जातांना दिसून येत आहे. जर नेतृत्वच गंभीर आणि खंबीर नसेल, तर इतर नेत्यांना सुस्ती येते. त्यामुळे नेतृत्व हे ऊर्जा भरणारे पाहिजे. मात्र तसे नेतृत्व काँगे्रसकडे सध्या तरी दिसून येत नाही. राहुल गांधी यांची धरसोड वृत्ती, राजकीय गांभीर्याचा अभाव, यामुळे ते राजकारणात फारसे यशस्वी होतांना दिसून येत नाही. काँगे्रस जोपर्यंत पक्षाला गंभीर, खंबीर आणि ऊर्जादायी नेतृत्व देणार नाही, तोपर्यंत काँगे्रसची गळती कुणीही थांबवू शकणार नाही. त्याचबरोबर काँगे्रसला आक्रमक व्हावे लागणार आहे. मात्र काँगे्रसचे नेते तुरुंगात जायला घाबरत आहे, आणि त्याऐवजी त्यांनी भाजपला सरेंडर करणे पसंद केले आहे. त्यामुळे काँगे्रसमधील नेते आधीच आतून घाबरलेले आहे. त्यात ईडी, सीबीआयचे छापे पडले की, त्यांची भंबेरी उडून जातांना दिसून येत आहे. 

COMMENTS