मुंबई/प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य पुणेच्या वतीने दि. 2 मे 2023 पासून आझाद म
मुंबई/प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य पुणेच्या वतीने दि. 2 मे 2023 पासून आझाद मैदान, मुंबई येथे स्वाधार योजनेतील बदलांसाठी भर उन्हात धरणे आंदोलन सुरु आहे. त्याबाबत विद्यार्थी हक्क समितीने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना स्मरणपत्राद्वारे कळविले आहे.
अनु. जातीतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास-उन्नतीचा उद्देश ठेवून सुरु करण्यात आलेल्या स्वाधार योजनेच्या चांगल्या अमलबजवाणीबाबत व स्वाधार योजनेतील त्रुटी दुर करणेसाठी विद्यार्थी हक्क समिती मागील 2 वर्षांपासून पाठपुरावा करत आहे व मागील 27 दिवसांपासून भर उन्हात आझाद मैदान मुंबई येथ् आंदोलन करत आहे. परंतू शासनाकडून अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या धर्तीवर स्वाधार योजनेचा लाभ देणे, चालू वर्षात मागील वर्षाचे 50 टक्के पेक्षा जास्त असलेले गुण गृहित धरुन लाभ देणे, महानगर पालिकेच्या हद्दीपासून 25 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेच्या लाभासाठी पात्र करणे, शिक्षणात 1 ते 2 वर्ष खंड असल्यास योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवणे, समकक्ष अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांस पात्र ठरवणे, शासन निर्णयामध्ये वापरण्यात आलेल्या अस्पष्टमध्ये स्पष्टता आणून क्लिष्टता कमी करणे, स्वाधार योजना सुरु झाल्यापासून तीच असलेली भोजन भत्ता व निवास भत्ता रक्कमेध्ये वाढ करुन 1 लाख करणे, स्वाधार योजना सन 2023-24 पासून ऑनलाईन करणे, स्वाधार योजनेचा प्रचार प्रसार करुन अधिकाधिक लाभार्थीपर्यत योजनेची माहिती पोहचविणे आदी सुधारणा करणेबाबत मागणी करण्यात आलेली आहे.
निवेदनामध्ये खात्याला पूर्णवेळ मंत्री नसल्यामूळे व विभागाचे अधिकारी योग्य पध्दतीने काम करत नसल्याबाबत मंत्री निवडणे व चांगेल अधिकारी विभागामध्ये असावेत अशी मागणी सुध्दा करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी मागील 2 वर्षांपासून स्वाधार योजनेच्या त्रुटी दुर करणेसाठी व योजनेचा लाभ वेळेत मिळणेसाठी आंदोलन करत आहेत. पुणे येथे 2 महिने आंदोलन आता आझाद मैदानावर 27 दिवसांपासून आंदोलन करुनही शासन दखल घेत नाही. ही बाब विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने निश्चीतच चांगली नाही. विद्यार्थ्यांना खरेतर आंदोलन करण्याची वेळच येऊ नये त्याच एवढ्या उन्हात आंदोलन करावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होत आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय करावा अशी मागणी होत आहे.
या योजनेमागील गौडबंगाल काय? – अनु. जाती नवबौध्दांचा विकास शिक्षणामुळे झालेला आहे. शासनाने शिक्षणासाठी स्वाधार ही चांगली योजना आणली आहे. पण योजनेमधील त्रुटी दुर करुन सदरील योजना अधिक सक्षमपणे राबविल्यास विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. शासन अनु. जाती कल्याण योजनमधून रस्ते, बांधकामे आदी गरजेच्या नसलेल्या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणत तरतूद करते. पण ज्या शिक्षणामुळे अनु. जाती नवबौध्दांचा विकास झालाय त्याच्यावरची आर्थिक तरतुद कमी करत आहे. यामागील गौडबंगाल काय आहे ?
सचिव भांगेंचा आंदोलन मोडीत काढण्यावर भर – बार्टीचे भांगे यांनी बंद केलेले प्रशिक्षण कार्यक्रम पुन्हा सुरु करणेसाठी विद्यार्थी अनेक दिवासांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. परंतू भांगेंचा आंदोलनाची दखल न घेता विविध कृल्प्त्या वापरुन ते कसे मोडून काढता येईल यावर भर असतो. पी.एचडी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील फेलोशिपसाठी आंदोलन करावे लागले. आता स्वाधार योजनेसाठी सुमारे महिन्याभरापासून शेकडो विद्यार्थी- विद्यार्थीनी उन्हात बसून आंदोलन करत आहेत तसेच बार्टीचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करणेसाठीसुध्दा मागील महिन्याभरापासून विद्यार्थी- विद्यार्थीनी आंदोलन करत आहेत, त्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी आजारी पडत आहेत. भांगेंना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चेद्वारे, संवादाद्वारे त्यांच्या मागण्या सन्मानाने मान्य करावयाच्या नसून मा. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन, विविध कृल्प्त्या वापरुन केवळ आंदोलन मोडून काढावयाचे आहे असे त्यांच्या एकूणच वागण्यावरुन दिसून येते.
COMMENTS