Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डा नव्हे तर भगदाड,अपघाला निमंत्रण-डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - तालुक्यातील जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धुळे ते सोलापूर या महामार्गावर मौजे.मांजरसुंभा येथील बीडकडे जाणा-या उड्डाणपूल स

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न ?
वनपरिक्षेत्रच्या कार्यालयाची अवस्था स्थलांतरित बिबट्यासारखीच ः नितीन शिंदे
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत धुसपुस; पोकळी भरून काढण्यासाठी राहुल व सम्राट महाडिक यांचे प्रयत्न

बीड प्रतिनिधी – तालुक्यातील जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धुळे ते सोलापूर या महामार्गावर मौजे.मांजरसुंभा येथील बीडकडे जाणा-या उड्डाणपूल संपतो त्याठिकाणी रस्त्यावर खड्डा नव्हे तर मोठं भगदाड पडले असून रात्री अपरात्री भगदाड लक्षात न आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसुन संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे यांना केली आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलेले असुन शासकीय नोंदीनुसार जानेवारी ते एप्रिल 2023 दरम्यान 120 दिवसात 129 अपघात आणि 139 जणांचा मृत्यू झाला आहे.शिवाय 98 अपघातात 130 जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. अपघात होण्यास अतिवेग हे जरी मोठ्या प्रमाणात कारण असले तसेच वाहनधारकांचा निष्काळजीपणा, ओव्हरटेक करणे,चुकीच्या दिशेने प्रवेश अथवा वाहन चालवणे पण त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे रस्ते जागोजागी रखडलेले अपुर्ण रस्ते व खड्डे पडणे हे सुद्धा अपघाताचे प्रमुख कारण आहे. प्रशासनाकडून राबविण्यात येणारे रस्ता सुरक्षा अभियानकागदावरच असुन रापम, पोलिस प्रशासन, आणि आरटीओ विभाग लाखों रुपये खर्च करून जनजागृतीच्या नावाखाली केवळ फोटोसेशन करताना दिसुन येते.याचा फारसा फायदा दिसून येत नसल्याने अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे.

COMMENTS