Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूकंपातील मृतांना कोयनेत श्रध्दांजली

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कोयना भागात 11 डिसेंबर 1967 रोजी झालेल्या महाप्रलंयकारी भूकंपाने शेकडोजण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला का

वडार समाजाचा प्रश्‍न सोमवारी विधिमंडळात मांडणार : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी
माजी सभापती आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कोयना भागात 11 डिसेंबर 1967 रोजी झालेल्या महाप्रलंयकारी भूकंपाने शेकडोजण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला काल 55 वर्षे पुर्ण झाली. मृतांना कोयनावासियांनी रविवारी सकाळी 11 वाजता येथील तीन मंदीरात श्रध्दांजली वाहीली.
यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख जयवंत शेलार, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, अशोकराव पाटील, कोयना सिचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार, अभियंता सागर पाटील, अनिल राणे, गजानन कदम, भाजपाचे नंदकुमार सुर्वे, बाळासाहेब कदम, पंकज गुरव, श्रमिक मुक्ती दलाचे सचिन कदम, डॉ. संतोष कदम, प्रदिप पाटील, मुख्याध्यापक गिरीगोसावी शालेय विद्यार्थी कोयना परिसरातील ग्रामस्थ कोयना प्रकल्प वन्यजीव विभाग पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
पाटण तालुक्यात 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे झालेल्या प्रलंयकारी भूकेपाने मोठी वित्तहानी व शेकडो निष्पाप जीवाचा बळी घेतला होता. हा दिवस कोयनावासियांसह राज्याला काळा दिवस ठरला आहे. दरवर्षी याच दिवशी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी कोयना परिसरातील ग्रामस्थ कोयना प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित राहतात. त्याप्रमाणे रविवारी सकाळी 11 वाजता तीन मंदीरात भागातील राजकीय सामाजिक क्षेत्राततील मंडळी विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी व शालेय विद्यार्थी शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येउन उपस्थित सर्वानी श्रध्दांजली वाहिली. यावेळी अनेकांनी भूकंपाच्या जुन्या कटू आठवणींना उजाळा दिला.

COMMENTS