Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात एक कोटी सहा लाख टन साखर उत्पादन ; इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्राचा झेंडा उंच

राज्यातील 190 साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी 140 दिवस गाळप करून एक कोटी सहा लाख टन साखर तयार केली आहे इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे 108 कोटी लिटरचे उद्दीष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे.

जिल्हा परिषदेतील 32 आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती
पावसाळ्यापूर्वी कास तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण
विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच

पुणे / प्रतिनिधी: राज्यातील 190 साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी 140 दिवस गाळप करून एक कोटी सहा लाख टन साखर तयार केली आहे इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे 108 कोटी लिटरचे उद्दीष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना एफआरपी दिली आहे. इथेनॉल विक्रीतून रक्कम रोख मिळाल्याने कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या उसाची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे शक्य झाले. एकूण 93 टक्के एफआरपी दिली गेल28

    19 कारखान्यांवर सुमारे 450 कोटी रूपयांची थकबाकी दिली नाही, म्हणून जप्तीची कारवाई झाली. आणखी दहा कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकाही ऊस ऊत्पादक शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी साखर आयुक्त कार्यालय दक्ष राहणार आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीमुळे उतारा कमी झाला; मात्र त्याची किंमत जमेस धरली जाणार असल्याने त्यातून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले. राज्यात यंदा दहा कोटी 12 लाख टन ऊसाचे गाळप झाले. 12 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला. आजमितीस राज्यात कुठेही गाळपासाठी ऊस शिल्लक नाही. सर्वाधिक म्हणजे 18.88 लाख टन गाळप हातकणंगले (ता. हुपरी) येथील जवाहर कारखान्याने केले. सर्वाधिक एफआरपी 528 कोटी रुपये त्यांनीच दिली. त्यांच्याकडून 22 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. अर्थ विभागाचे संचालक ज्ञानदेव मुकणे तसेच उपपदार्थचे सहसंचालक संजय भोसले, पांडुरंग शेळके (विकास), ऊत्तम इंदलकर (प्रशासन), राजेश सुरवसे (प्रशासन) आदी या वेळी उपस्थित होते. धाराशिव कारखान्यांबरोबरच आता आणखी 19 कारखाने ऑक्सिजन निर्मिती करणार आहेत. काही कारखाने लगेच सुरू होणारा ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित करत असून त्याचे पैसेही त्यांनी जमा केले आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

COMMENTS