Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक मागासलेपणाचा संदर्भ चुकीचा ः सदावर्ते

मुंबई ः मराठा आरक्षणाच्या कायद्यावरच गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला मागास दाखवण्यासाठी जो संदर्भ दिला गेला, तोच चुकीचा अस

पत्रकारांच्या आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी संघटित प्रयत्न गरजेचे : रविंद्र बेडकिहाळ
स्वामींची कृपा झाली आणि भावाला पोलिसांनी सोडले…| Shree Swami Samartha Anubhav | Swami Samarth (Video)
नागपूरमध्ये एटीएसची कारवाई ;तिघांना घेतले ताब्यात

मुंबई ः मराठा आरक्षणाच्या कायद्यावरच गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला मागास दाखवण्यासाठी जो संदर्भ दिला गेला, तोच चुकीचा असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. या संदर्भात जी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष न्या. शुक्रे हे मराठा आरक्षणवादी कार्यकर्ते असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. मी मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा निषेध करतो, असेही सदावर्ते म्हणाले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्या आधारावर आर्थिक मागासलेपणा किंवा सामाजिक मागासलेपणामध्ये रुपांतरित करत आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे या संदर्भातील अनेक निवाडे आहेत. त्यामध्ये या साठीच्या गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत. त्या गाईडलाईचा ’चकनाचूर’ करण्यात आला असल्याचा आरोप देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

COMMENTS